पुण्यात आंबा महोत्सवास प्रारंभ

पुण्यात आंबा महोत्सवास प्रारंभ
पुण्यात आंबा महोत्सवास प्रारंभ

पुणे  ः राज्य कृषी पणन मंडळाच्या शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आंबा महोत्सवाला सोमवारपासून (ता. १) प्रारंभ झाला. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सुमारे ५५ शेतकऱ्यांनी हापूस आंबा विक्रीसाठी आणला आहे. मार्केट यार्डच्या पीएमटी डेपोशेजारी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

महोत्सवात सहभागी झालेले शेतकरी जयेश मांजरेकर (मांजरे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) म्हणाले, की माझी आंब्याची सुमारे १५०० झाडे असून, आंबा महोत्सवाला गेल्या वर्षीपासून येताे. गेल्या वर्षी ४०० पेट्या आंबा विक्री केला. यंदा अतिथंडी आणि थ्रिप्समुळे फळगळ झाल्याने ३० टक्के कमी फळे आहेत. यंदा आता डझनला ६०० ते ८०० रुपयांचा दर आहे. महोत्सवात आंबा विक्रीसाठी आणत असल्याने मुंबईला केवळ मुहूर्ताच्या पेट्या पाठवताे. मुंबई बाजार समितीपेक्षा या महोत्सवात दर ५० टक्के जास्त मिळतो. 

अक्षय दत्ताराम माने (पडेल, देवगड, सिंधुदुर्ग) म्हणाले, की आता महोत्सवात पहिल्या टप्प्यात १०० डझन आंबा आणलाय. हळूहळू आवक वाढेल. अक्षय तृतीयेनंतर मोठी आवक सुरू होईल. सध्या आंब्याला ९०० ते १२०० रुपये डझन दर आहे. थ्रिप्सने फळगळ झाल्याने यंदा २० ते २५ टक्के कमी उत्पादन हाेईल. 

खरेदीदार नरेश लाटे (रा. कर्वे रस्ता) म्हणाले, की दरवर्षी मी महोत्सवातून आंबा खरेदी करतो. आळंदी देवस्थानमध्ये आमचा महाप्रसाद असून, आता २४ डझन आंबे खरेदी केला आहे. यातील काही आंबे घरी नेणार असून, यानंतर नियमित आठवड्याला २-३ पेट्यांची खरेदी होईल. मागील वर्षीप्रमाणेच दर आणि फळांचा दर्जा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com