Agriculture news in marathi Mango purchase and sale in Ratnagiri market committee from tomorrow | Agrowon

रत्नागिरी बाजार समितीत उद्यापासून आंबा खरेदी-विक्री

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 एप्रिल 2020

रत्नागिरी ः आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आंबा खरेदी-विक्री सुरू करण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी दिल्या आहेत. पणनच्या मदतीने २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यानंतर बाजार समितीच्या आवारात याची सुरुवात होणार आहे. 

रत्नागिरी ः आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आंबा खरेदी-विक्री सुरू करण्यात येणार आहे. तशा सूचना जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी दिल्या आहेत. पणनच्या मदतीने २३ एप्रिलपासून दुपारी ३ वाजल्यानंतर बाजार समितीच्या आवारात याची सुरुवात होणार आहे. 

राज्यात ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. ‘कोरोना’ विषाणू संसर्गाचे पार्श्वभूमीवर सध्या ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा खुल्या बाजारात विक्री करणे अवघड झाले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. या बाबीचा विचार करुन रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमन कायद्यान्वये जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांचा आंबा खरेदी- विक्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात तरतूद आहे. याचा विचार करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कृषी पणन मंडळ आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांची संयुक्त सभा २० एप्रिलला झाली. 

आंबा हे राष्ट्रीय फळ असून कोकणातील आंब्याला जीआय मानांकन प्राप्त आहे. जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी या सभेत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. अशोक गार्डी यांनी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादित आंबा बाजार समितीच्या आवारात घेऊन येण्याबाबत आवाहन केले आहे. आंबा घेऊन येताना त्याची प्रत गुणवत्ता चांगली असावी म्हणजेच फळाचे वजन १८० ग्रॅम पेक्षा जास्त असावे व डाग विरहीत असावा. 

आंबा खरेदी-विक्री २३ एप्रिलपासून दररोज दुपारी तीन वाजल्यानंतर बाजार समितीच्या आवारात होणार आहे. आंबा बागायतदारांनी अधिक माहितीसाठी am_ratnagiri@msamb.com या ई-मेल वर अथवा किरण महाजन ९४२२६३६८३०, संजय आयरे ७३८७६०६५६५ यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा उपनिंबधक डॉ. गार्डी यांनी आवाहन केले आहे. 


इतर बाजारभाव बातम्या
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये मोसंबी ६०० ते १२०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
केळी दरात सुधारणा, परराज्यात पाठवणी...जळगाव ः केळी दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली...
नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...