मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी : महाआघाडीचा जाहिरनामा
मुंबई : शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता यांसारख्या घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने जाहीरनाम्यातून केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीने सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘शपथनामा’ जाहीर केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, एकनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

यात उद्योग, शेती, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरण या सात मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा या शपथनाम्यात अंतर्भाव करत बेरोजगार युवकांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासनही काँग्रेस आघाडीने दिले आहे.
या वेळी जयंत पाटील म्हणाले, की हा जाहीरनामा तयार करण्यासाठी आघाडीच्या वतीने एक समिती तयार करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी मोठी मेहनत घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर यांनी देखील यामध्ये विशेष योगदान दिले आहे.
शपथनाम्यातील ठळक मुद्दे
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी.
- सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता.
- शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण.
- उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज.
- राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा.
- कामगारांना किमान २१ हजार वेतन.
- स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ.
- सर्व महापालिका हद्दीतील ५०० चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी.
- ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा करणार.
- ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान देणार.
- दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव.
- जात पडताळणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणार
- विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मागास तालुक्यांमध्ये उद्योगधंदे वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखणार.