agriculture news in marathi, manifesto published by congress and rashtrawadi congress, mumbai | Page 3 ||| Agrowon

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी : महाआघाडीचा जाहिरनामा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

मुंबई  : शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता यांसारख्या घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने जाहीरनाम्यातून केल्या आहेत. 

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीने सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘शपथनामा’ जाहीर केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, एकनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

मुंबई  : शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता यांसारख्या घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने जाहीरनाम्यातून केल्या आहेत. 

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीने सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘शपथनामा’ जाहीर केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, एकनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

यात उद्योग, शेती, शिक्षण, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरण या सात मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा या शपथनाम्यात अंतर्भाव करत बेरोजगार युवकांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे तसेच स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासनही काँग्रेस आघाडीने दिले आहे.

या वेळी जयंत पाटील म्हणाले, की हा जाहीरनामा तयार करण्यासाठी आघाडीच्या वतीने एक समिती तयार करण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी मोठी मेहनत घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर यांनी देखील यामध्ये विशेष योगदान दिले आहे. 
 
शपथनाम्यातील ठळक मुद्दे

  • शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी.
  • सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता.
  • शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण.
  • उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज.
  • राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा.
  • कामगारांना किमान २१ हजार वेतन.
  • स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ.
  • सर्व महापालिका हद्दीतील ५०० चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी.
  •  ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा करणार.
  • ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान देणार.
  • दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव.
  • जात पडताळणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणार
  • विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मागास तालुक्यांमध्ये उद्योगधंदे वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखणार.

इतर ताज्या घडामोडी
दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसानपरभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी...
‘कोरोना’च्या चाचणी, रोगनिदानासाठी...परभणी ः परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान...
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गहू...बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४)...
अनुकूल हवामानात होते पिकांची चांगली वाढमागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस,...
काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने...अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर,...
शेतमाल वाहतुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन...नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी...
पिंपळगांवला मागणी कमी झाल्याने दूध...पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह...
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...