मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार : भुजबळ

गुजरातकडे वाहून जाणारे पाणी मांजरपाडा प्रकल्पाद्वारेगोदावरी खोऱ्यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भागविण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार : भुजबळ
मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार : भुजबळ

नाशिक : मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होणार असून, यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पाणी उपलब्ध होणार आहे. भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भागविण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. दिंडोरी येथील मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. २) विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या समवेत पाहणी केली. या वेळी अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता विश्‍वास दराडे, प्रांत अधिकारी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, सहायक अभियंता सुभाष पगारे, सुधीर सालकाडे, विनीत कराड, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. मांजरपाडा प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. दायित्वाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्य धरणाचे अपूर्ण काम सुरू करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत प्रकल्पाचे काम ८७ टक्क्यांपेक्षा काम झाले असून, मे २०२१ अखेरपर्यंत या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. एकूण ९० मीटर उंचीचे धरण आहे. मात्र मध्यंतरी काम बंद राहिले. आता सुरू झाल्यापासून १५ मीटर उंचीचे धरणाचे बांधकाम झाले असून, आता केवळ १४ मीटर धरणाचे बांधकाम शिल्लक राहिले आहे. त्याचबरोबर धरणाचे मातीकाम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मुख्य धरणाच्या सांडव्याची घळभरणी सुरू असून, हे काम १५ मेपर्यंत करण्याचे नियोजन असल्याने जलदगतीने काम करण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com