Agriculture news in marathi; The manjarpada water reached in daraswadi dam | Agrowon

मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

नाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी पोचविण्यासाठी छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले होते. पुणेगाव धरण आणि केद्राई धरणातून एकाचवेळी पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, दरसवाडी धरण भरले जात आहे. मांजरपाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, पुणेगाव धरणाद्वारे पाणी पुणेगाव दरसवाडी, डोंगरगाव पोच कालव्यातून दरसवाडी धरणात पोचले आहे. 

नाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी पोचविण्यासाठी छगन भुजबळ यांनी प्रयत्न केले होते. पुणेगाव धरण आणि केद्राई धरणातून एकाचवेळी पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, दरसवाडी धरण भरले जात आहे. मांजरपाडा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, पुणेगाव धरणाद्वारे पाणी पुणेगाव दरसवाडी, डोंगरगाव पोच कालव्यातून दरसवाडी धरणात पोचले आहे. 

येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे येवला तालुक्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मांजरपाडा प्रकल्पाचे जलपूजन झाल्यानंतर भुजबळ यांच्याकडून पुणेगाव डोंगरावर कालव्यातून विसर्ग होत असलेल्या पाण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत कालव्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या असून युद्धपातळीवर कालव्याच्या सफाईचे काम सुरू आहे.

दरम्यान, दरसवाडी धरण परिसरात पाऊस झाला नसल्याने धरण कोरडे आहे. धरण भरण्यास उशीर होत आहे. यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून आढावा घेण्यात येत असून त्यांनी गेल्या आठ दिवसांत कालव्याची दोनदा पाहणी केली. या वेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, गणपत कांदळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, दिलीप खैरे, अरुण थोरात यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


इतर बातम्या
दक्षिण कर्नाटक, तामिळनाडूत मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आज (ता....
सोलापुरात नुसताच सोसाट्याचा वारा सोलापूर  ः निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई,...
अकलूजच्या शिवामृतकडून गाईच्या दूधाला २५...अकलूज, जि. सोलापूर : अकलूज येथील शिवामृत दूध...
‘निसर्ग’च्या नुकसानग्रस्तांना...नाशिक : निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यासह जिल्ह्याला...
जालन्यात कृषी विभागाच्या बांधावर खत...जालना : एकाच दिवशी शेतकऱ्यांना थेट बांधावर खत...
नाशिक जिल्ह्यातील ६५० विद्युत खांब...नाशिक : जिल्ह्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह...
कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना तत्काळ पीक...परभणी : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
सोलापूर जिल्ह्यात १३ टँकरद्वारे...सोलापूर : जिल्ह्यात आतापर्यंत ४० गावांमध्ये १३...
पीककर्ज द्या, वीजबिल माफ करा,...सोलापूर  ः शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया...
पुणे बाजार समितीत शेतीमालाची आवक तुरळकचपुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु...
औरंगाबाद जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व कपाशी...औरंगाबाद : जिल्ह्यात येत्या खरीप हंगामात...
जालन्यात सव्वा लाख क्विंटलवर कापूस...जालना : जिल्ह्यात कापूस खरेदीची एकूण ८...
नुकसानग्रस्तांना मदतीबाबत योग्य तो...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे...
निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः निसर्ग चक्रीवादळ आणि अति पावसाचा...
कोकणात पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रात आलेल्या ‘निसर्ग’...
मंजुर येथील बंधाऱ्याचा भराव पहिल्याच...नगर  ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर...
रविवारपर्यंत मॉन्सूनची आणखी चाल शक्य पुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरूवारी...
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी...रत्नागिरी  : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले...
भुईबावडा परिसरातील तीन गावांना ...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील भुईबावडा (ता.वैभववाडी)...
हमीभाव मिळवून देण्यात केंद्र सरकार...पुणे: केंद्र सरकार गाजावाजा करून हमीभाव जाहीर करत...