नांदेडमध्ये ऊसदरासाठी मनसेचे ढोल बजाओ आंदोलन

नांदेडमध्ये ऊसदरासाठी मनसेचे ढोल बजाओ आंदोलन
नांदेडमध्ये ऊसदरासाठी मनसेचे ढोल बजाओ आंदोलन

नांदेड ः नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गतच्या चार जिल्ह्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार भाव न देणाऱ्या कारखान्याच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरातील फरकाची रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी (ता. ५) प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनीही शासनाचे नियम डावलून एफआरपी प्रमाणे भाव दिलेला नाही. नांदेड जिल्ह्यातील भाऊराव सहकारी साखर कारखान्याने १ हजार ७०० रुपये, कुंटूरकर शुगर्स २ हजार २०० रुपये, बाऱ्हाळी येथील शिवाजी सर्व्हिस कारखान्याने १ हजार ८०० रुपये याप्रमाणे दर दिले आहेत. त्यामुळे दरातील फरकाची रक्कम तत्काळ देण्यात यावी. 

भाव कमी देणाऱ्या साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी साखर सहसंचालक कार्यालयासमोर मंगळवारी (ता. ५) करण्यात आलेल्या ढोल बजाओ आंदोलनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार जयप्रकश बावसकर, जिल्हाध्यक्ष मॅान्टीसिंग जहागीरदार, रवी राठोड, राज अवतानी, शफीक अब्दुल, उषाताई नरवाडे, राजू पाटील बरडे, गजानन चव्हाण, संतोष सुनेवाड, शक्ती परमार, पप्पू मनसूके, महेश ठाकूर, गजानन यादव, शिवराज पाटील, गणेश पाटील, प्रवीण मंगनाळे, संतोष बनसोडे, शंकर पाटील, अनिल मुंडकर, शंकर महाजन, अमोल जाधव, गजानन वासमवार, रोहीत कटकमोड, पांडूरंग कोल्हेवाड, रानी वाघमारे, रंजना भवरे, प्रेमिला हमन्ते, उमा सूर्यवंशी, सागर मंडलपुरे, साहेबराव कोंडावार, व्यंकट वडजे आदीसह कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com