Agriculture news in marathi; As many as 19 tankers are still operational in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूच

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 सप्टेंबर 2019

सांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाई सुरू झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुष्काळ भागातील गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून दुष्काळी पट्ट्यातील जनता टॅंकरच्या पाण्याचा आधार घेत असून सप्टेंबर महिना संपत आला तरी जिल्ह्यातील १९१ गावांतील एक लाख ८४ हजार ८८८ नागरिक व २९ हजार जनावरांना ९१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. 

सांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच पाणीटंचाई सुरू झाली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दुष्काळ भागातील गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून दुष्काळी पट्ट्यातील जनता टॅंकरच्या पाण्याचा आधार घेत असून सप्टेंबर महिना संपत आला तरी जिल्ह्यातील १९१ गावांतील एक लाख ८४ हजार ८८८ नागरिक व २९ हजार जनावरांना ९१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरूच आहे. 

जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर आणि तासगाव तालुक्यांत जुलै महिन्यात दुष्काळी भागातील २२१ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. या टॅंकरच्या माध्यमातून १८० गावे एक हजार २२५ वाड्यावस्त्यांमधील ४ लाख ५ हजार ८९१ लोकसंख्येला २२१ पाणी दिले जात होते. पावसाळा संपला, सप्टेंबर महिना संपत आला तरी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात अजून पावसाचा लपंडाव सुरूच आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे टॅंकरची संख्या कमी झाली असली तरी सध्या त्या भागात पाणी टंचाई सुरूच आहे. जत तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत ११६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता.

मात्र, या तालुक्यात दमदार पाऊसदेखील झाला नाही. मात्र, दोन महिन्यांनंतर याच तालुक्यात  ६६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. वास्तविक पाहता या तालुक्यात अजूनही पाणीटंचाई आहेच, पण टॅंकरची संख्या कमी कशी झाली असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. टॅंकरची संख्या कमी झाली असली तरी टॅंकर बंद झालेले नाहीत. पूर्व भागातील पाणीटंचाई कायम आहे.


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...
मराठवाड्यात खरीप ज्वारीची ३७ टक्के पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात...
शाश्वत शेती उत्पादनासाठी मातीतील जिवाणू...स्थानिक झाडे झुडुपांच्या मुळाच्या परिसरातील...
भुसावळमध्ये १५ हजार हेक्टरवर कपाशीभुसावळ, जि.जळगाव  : गतवर्षी अतिवृष्टीमुळे...
पुणे जिल्ह्यात जोरदार श्रावण सरी पुणे ः दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख शेतकरी...नांदेड : जिल्ह्यातील बॅंका जुन्या कर्जदार...
खानदेशात खतांची मागणी घटली जळगाव : खानदेशात मागील आठवड्यात खत टंचाईची तक्रार...
सोयाबीनवरील किडीप्रश्‍नी योग्य वेळी...परभणी : ‘‘सोयाबीन हे कपाशी एवढेच राज्यातील...
नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करा...नाशिक : ‘‘आगामी काळातील गणेशोत्सव साजरा करताना...
कोल्हापुरात दमदार पावसामुळे नद्यांनी...कोल्हापूर ः जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) पावसाचा जोर...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जातून ९८४...सोलापूर  ः जिल्ह्यासाठी यंदाच्या खरीप...
येऊलखेड शिवारात शेकडो एकरांतील पीक...बुलडाणा ः जिल्ह्यात शेगाव तालुक्यात सोयाबीनचे पीक...
युरियाच्या मुद्यावरून अकोला जिल्हा...अकोला ः जिल्ह्यात युरियाची ग्रामीण भागात तीव्र...
उसामध्ये पोक्का बोईंग, शेंडाकूज रोगाचा...सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...