Agriculture news in Marathi, Many irrigation projects in Khandesh were filled | Agrowon

खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प भरले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जळगाव ः खानदेशातील अवर्षणप्रवण भागातील काही प्रकल्प यंदा अनेक वर्षांनंतर १०० टक्के भरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, बोरी, मंगरूळ, गारबर्डी, गूळ, मोर आदी प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. प्रकल्प भरल्याने रब्बी हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

जळगाव ः खानदेशातील अवर्षणप्रवण भागातील काही प्रकल्प यंदा अनेक वर्षांनंतर १०० टक्के भरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील हतनूर, गिरणा, बोरी, मंगरूळ, गारबर्डी, गूळ, मोर आदी प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. प्रकल्प भरल्याने रब्बी हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

रब्बी हंगामाची मदार जळगाव जिल्ह्यात गिरणा, वाघूर व हतनूर या मोठ्या प्रकल्पांवर आहे. सुमारे सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्राला या प्रकल्पांच्या माध्यमातून रब्बीसाठी पाणी मिळते. यातील गिरणा व हतनूर प्रकल्पात १०० टक्के साठा असणार आहे. तर वाघूर प्रकल्पदेखील ८४ टक्‍क्‍यांवर भरला असून, त्यातही १०० टक्के जलसाठा निर्माण होण्याची अपेक्षा आहे. 

धुळे जिल्ह्यात अनेर प्रकल्प दरवर्षी १०० टक्के भरतो. हा प्रकल्प यंदाही भरला असून, त्यातून विसर्ग सुरू आहे. पांझरा प्रकल्पातूनही विसर्ग सुरू असून, या दोन्ही प्रकल्पांमधून रब्बीसाठी पाणी मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात रंगावली, दरा, सुसरी व शिवन प्रकल्पदेखील १०० टक्के भरले आहेत. यामुळे टंचाईस्थिती निर्माण होणार नसल्याचे चित्र या भागात आहे. धुळे जिल्ह्यातील मालनगाव, बुराई, करवंद व अमरावती हे प्रकल्प अनेक वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील बोरी, हिवरा हे प्रकल्पदेखील अनेक वर्षांनंतर १०० टक्के भरले आहेत. तर अंजनी, बहुळा या प्रकल्पांतही चांगला जलसाठा निर्माण झाला आहे. सध्या बोरी, हिवरा प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.

हे प्रकल्प रिकामे व अर्धवट
खानदेशात धुळे जिल्ह्यातील सोनवद व कनोली हे प्रकल्प अर्धवट भरले आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील अग्नावती व मन्याड या प्रकल्पातील साठा मृतसाठ्यापेक्षा अधिक झालेला नाही. अनेक प्रकल्प भरल्याने खानदेशातील गिरणा, तापी, पांझरा, जामखेडी, रंगावली, सुसरी, भोकरी, मोर आदी नद्यांना चांगले प्रवाही पाणी आहे.

इतर ताज्या घडामोडी
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
मराठवाड्यातील ३७१ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/ परभणी ः मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात संततधार पाऊसपुणे : पुणे जिल्ह्यात सर्वदूर शनिवारपासून (ता. १९...