सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार : मुख्यमंत्री

सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार : मुख्यमंत्री
सूक्ष्म सिंचनाचे अनेक प्रकल्प राबविणार : मुख्यमंत्री

परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय जागतिक बँकेच्या सहकार्याने सूक्ष्म सिंचनाचे अनेक नवीन प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज पुरवठा करावा, यासाठी सहकार विभागामार्फत बॅंकांना सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

फडणवीस यांनी सोमवारी (ता. १४) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘लोकसंवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषीसह अन्य विभागाच्या योजनांचे जिल्ह्यातील १५ लाभार्थी या वेळी उपस्थित होते. 

फडणवीस यांनी शेतीविषयक विविध योजना, शासनाचे धोरण आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ करण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. दरम्यान, जालना, पालघर आणि अहमदनगर या जिल्ह्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संवाद सुरू झाला. शेषेराव निरस (पडेगाव, ता.गंगाखेड), शिवाजीराव सानप, खुशाळ काळे (शेवडी, ता.जिंतूर), दत्तात्रय कच्छवे (दैठणा, ता.परभणी), जयमाला शिंदे (पोहटाकळी, ता.पाथरी), मोहन कापसे (मंगरुळ, ता. मानवत), प्रताप काळे (धानोरा-काळे, ता.पूर्णा), पंडित थोरात (खानापूर, ता.परभणी), मंगेश देशमुख (पेडगाव, ता.परभणी) यांनी योजनांचे फायदे सांगितले.

पीक विमा योजनेतील सुधारणा, जलयुक्त शिवार अभियानातील कामाचे फायदे, पीक आणि कृषी कर्जपुरवठ्यातील अडचणी, यांत्रिकीकरण, शेडनेट, कांदाचाळा, संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार, कृषी सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे आदी योजनांचा त्यात समावेश होता. वीज भारनियमन, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या समस्या मांडल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com