नांदेड जिल्ह्यातील अनेक प्रकल्प तुडुंब

नांदेड : चालू वर्षी दमदार पाऊस झाल्याने मराठवाड्यातील मांजरा प्रकल्प वगळता लहान, मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. आगामी काळातील पाण्याची चिंता मिटली आहे.
 Many projects in Nanded district are in full swing
Many projects in Nanded district are in full swing

नांदेड : चालू वर्षी दमदार पाऊस झाल्याने मराठवाड्यातील मांजरा प्रकल्प वगळता लहान, मोठे प्रकल्प तुडुंब भरले आहेत. आगामी काळातील पाण्याची चिंता मिटली आहे. दमदार पावसामुळे प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जायकवाडी धरणापासून ते नांदेड जिल्ह्यातील बळेगाव बंधाऱ्यापर्यंतचे अनेक प्रकल्प तुडुंब आहेत.

यंदाच्या वर्षी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे यंदा जायकवाडीपासून ते विष्णुपुरी, आमदुरा, बळेगावपर्यंतचे जवळपास सर्व प्रकल्प तुडुंब भरले आहेत. काही मोठे प्रकल्प भरल्याने त्याचे काही दरवाजेही उघडून पाण्याचाही विसर्ग करावा लागला आहे. चांगला पाऊस झाल्याने अनेक मोठे, लघु, मध्यम प्रकल्प तसेच कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे जवळपास भरले आहेत. ओढे, नदी, नाले भरुन वाहण्यासोबतच विहिरी, तलावांतही पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामाचे पिकही चांगले येण्याची शक्यता कृषि विभागाने व्यक्त केली आहे. 

नांदेडजवळ गोदावरी नदीवर असलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प यंदा जुलै महिन्यापासूनच भरण्यास सुरुवात झाली आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ८०.८९ दलघमी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा सातत्याने राहिल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली. 

आत्तापर्यंत जवळपास सातशे दलघमी पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले आहे. जायकवाडी, सिद्धेश्वर आणि येलदरी ही मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्याचबरोबर इसापूर येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पही ९४.१९ टक्के भरला आहे. असे असले तरी लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्प मात्र जोत्याखाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com