Agriculture news in Marathi Many registered farmers are deprived of sorghum sales | Page 2 ||| Agrowon

अनेक नोंदणीधारक शेतकरी ज्वारी विक्रीपासून वंचित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

जिल्ह्यात ११ हजार क्विंटलची नोंदणी असताना शासनाकडून दोनदा मिळून केवळ तीन हजार क्विंटलची खरेदी होणार आहे. त्यामुळे आठ हजार क्विंटल ज्वारी शेतकऱ्‍यांना एक हजार २०० रुपयांचा प्रतिक्विंटल तोटा सहन करून विकावा लागेल हे नक्की. 

भालेर, जि. नंदुरबार ः जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३०) पासून पुन्हा पणन महासंघातर्फे ज्वारीच्या खरेदीला प्रारंभ झाला असून, शनिवार (ता. ३१) पर्यंत जिल्ह्यातील नंदुरबारसाठी दोन हजार १५८ तर शहाद्यासाठी ५०४ क्विंटल ज्वारीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे जिल्ह्यात ११ हजार क्विंटलची नोंदणी असताना शासनाकडून दोनदा मिळून केवळ तीन हजार क्विंटलची खरेदी होणार आहे. त्यामुळे आठ हजार क्विंटल ज्वारी शेतकऱ्‍यांना एक हजार २०० रुपयांचा प्रतिक्विंटल तोटा सहन करून विकावा लागेल हे नक्की. 

यातही नंदुरबार येथील २८७ शेतकऱ्‍यांसाठी दोन हजार १५८ तर शहादा येथील ६७ शेतकऱ्‍यांसाठी ५०४ क्विंटल ज्वारी खरेदीचा कोटा ठरवला आहे. यामुळे राज्य सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त होत आहे. गहू, मका, ज्वारी खरेदीसाठी १ मे ते ३० जून, हा कालावधी ठरविला होता. नंदुरबार जिल्ह्यात ज्वारीसाठी ३५४ शेतकऱ्‍यांनी ११ हजार क्विंटल ज्वारी नोंदणी केली. मात्र, हमीभाव केंद्राने जिल्ह्याचा कोटा फक्त ८५० क्विंटल ठरवला होता. भरडधान्य खरेदी केंद्र तब्बल ४० दिवसांनंतर म्हणजेच १० जूनपासून सुरू झाले. २० शेतकऱ्‍यांची ८५० क्विंटल खरेदी झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच धान्य भरड केंद्र बंद केल्याने शेतकरी संतप्त झाले होते. 

या बाबत शेतकऱ्यांनी जिल्हा विपणन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून विचारणा केल्यानंतर त्यांनी जिल्ह्याचा ज्वारी खरेदीचा कोटा पूर्ण झाल्याचे सांगितले. यामुळे जिल्ह्यातील ३५४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. शेतकऱ्‍यांची ज्वारी ही बाजार समितीमध्ये खासगी व्यापारी एक हजार ४०० रुपये दराने खरेदी करतात. तर शासनाने दोन हजार ६५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर आपली ज्वारी दोन हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केली जावी, अशी अपेक्षा होती.

यासाठी काही शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीत असताना शासनाने ज्या शेतकऱ्‍यांनी ज्वारीची नोंदणी केली आहे, अशा जिल्ह्यातील ३५४ शेतकऱ्‍यांची ज्वारी ही दोन हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्याचे निश्चित केले. जिल्ह्यात शुक्रवारी (ता. ३०) जुलै शासकीय ज्वारी खरेदी सुरू झाली. पण सर्व नोंदणीधारकांची ज्वारी खरेदी होऊ शकणार नाही, असे दिसत आहे.


इतर बातम्या
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...
किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊसनांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस...
रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई...अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नाशिक : शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ...नाशिक : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने...
सोयाबीनचे दर दबावाखाली;  ‘स्वाभिमीनी’चे...परभणी : सोयाबीनचे दर कोसळविणाऱ्या राज्य व केंद्र...
ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको :...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे...
‘नासाका’ सुरू होण्याची प्रक्रिया पुढे...नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू...
अकोला :सोयाबीन, कापूस उत्पादक  सततच्या...अकोला : सोयाबीन काढणीला तयार होत असतानाच पावसाची...
कुसुम सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना...नाशिक : ‘नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून...
इंधवे येथील पाझर तलावाची दुरुस्ती होईनापारोळा, जि. जळगाव : इंधवे (ता. पारोळा) येथील पाझर...
पांगरी परिसरात मुसळधारेचा सोयाबीन... पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात...
सौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...
मराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...
तंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...