पुणे जिल्ह्यातील अठराशे गावांचे नकाशे ऑनलाइन

पुणे जिल्ह्यातील अठराशे गावांचे नकाशे ऑनलाइन
पुणे जिल्ह्यातील अठराशे गावांचे नकाशे ऑनलाइन

पुणे ः पुणे जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाकडून सातबारा उतारा आणि गाव नकाशा एकमेकांशी लिंक करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील एक हजार ९१० गावांपैकी एक हजार ७७५ गावांचे गाव नकाशे सातबारा उताऱ्यांशी लिंक झाले आहेत. त्यामुळे जमिनीच्या चतुःसीमा, लगतचे गट नंबर, त्यांचे मालक कोण आहेत, याची माहिती भूमी अभिलेख विभागाने घरबसल्या उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीत होणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसणार असून जमीन खरेदीदारांची फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. सात-बारा उतारा आणि जमिनीचा नकाशा एकमेकांशी लिंक केल्यामुळे जमिनीची खरेदी आणि दस्तनोंदणी करण्यापूर्वी ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळत आहे. यापूर्वी गावतलाठ्याच्या कार्यालयात जाऊन सर्व माहिती घ्यावी लागत होती. त्याची आता गरज लागणार नाही. सातबारा उतारा गाव नकाशाची लिंक केल्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्यातील अथवा गावातील जमिनीची अक्षांश रेखांशसह (जीएसआय) सर्व माहिती शेतकऱ्यांना सहजरीत्या उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. आॅनलाइन केल्यामुळे नागरिकांना ज्या सर्व्हे नंबर अथवा गट नंबरमधील जमीन खरेदी करीत आहात, त्या सर्व्हे नंबरचे एकूण क्षेत्र, त्यात असलेले पोटहिस्से त्यांचे मालक यांचीदेखील माहिती माळणार आहे. भूमी अभिलेख विभागाने गाव नकाशे पीडीएफमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांची निशुल्क प्रिंट काढून दस्त खरेदीलादेखील जोडता येणार आहे. त्यामुळे जमिनीची खरेदी- विक्री करणे आता अधिक सोपे होणार आहे. तर जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीलादेखील आळा बसणार आहे. गाव नकाशे सातबारा उताऱ्याशी लिंक राज्यात सुमारे ४४ हजार गावे आहेत. त्यापैकी ३७ हजार गावांतील गाव नकाशे सातबारा उताऱ्यांशी लिंक करण्यात आले आहेत. हे काम वेगाने सुरू असून लवकरच उर्वरित सर्वच गावांतील गाव नकाशे लिंक करण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती भूमी अभिलेख विभागातील सूत्रांनी दिली. भूमिमी अभिलेख विभागाच्या http://mahabhunakasha.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com