agriculture news in marathi, Maratha Kranti Morcha's 'Solapur Bandh' on Monday | Agrowon

मराठा क्रांती मोर्चाचा सोमवारी ‘सोलापूर बंद'
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 जुलै 2018

सोलापूर  : मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी (ता. ३०) सोलापूर बंद पुकारला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीमुळे वारकरी घरी जाईपर्यंत आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाने घेतला होता. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सोलापुरात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.  त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले. शहरात सगळे व्यवहार काहीसे सुरळीत होते, पण जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी पडसाद उमटलेच.

सोलापूर  : मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी (ता. ३०) सोलापूर बंद पुकारला आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीमुळे वारकरी घरी जाईपर्यंत आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा मोर्चाने घेतला होता. त्यानुसार आता हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सोलापुरात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.  त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आले. शहरात सगळे व्यवहार काहीसे सुरळीत होते, पण जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी पडसाद उमटलेच. करमाळा, मोहोळ, माढा तालुक्‍यात काही गावात बंद पाळून सरकारचा निषेध करण्यात आला.

बुधवारी (ता.२५) पुन्हा मोहोळ तालुक्‍यातील पापरी, करमाळा तालुक्‍यातील केममध्ये पूर्णतः बंद पाळण्यात आला. त्याशिवाय सांगोला, मंगळवेढा, बार्शी आणि माढ्यातील काही भागातही बंदची स्थिती राहिली. तसेच अनेक ठिकाणी तहसीलदार आणि प्रांतांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीचा लाभ द्यावा, शैक्षणिक संस्थांनी मराठा विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देणारे निवेदन बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.

 आज होणार महत्त्वपूर्ण बैठक

शासनाने आदेश देऊनही जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून १०० टक्‍के शुल्क घेतले आहे. काहींनी विद्यार्थ्यांना ते परतही केलेली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता.२६)  सकाळी ११ वाजता बैठक होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी आंदोलनकर्त्यांना आश्‍वासन दिले.

इतर बातम्या
उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी सरकारची मदत...अकलूज, जि. सोलापूर : ‘‘देशातील काही श्रीमंत...
फांगदर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त...नाशिक : देवळा तालुक्यातील फांगदर येथील...
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही...यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या...
बागलाण व देवळा तालुक्यांत बाजरी काढणीला...नाशिक : बागलाण व देवळा तालुक्यांत लष्करी...
परभणी जिल्ह्यात कृषी संजीवनींतर्गत २१...परभणी : जिल्ह्यात जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्याने...
हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदीनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सांगली : महापुरात खरीप पिकांचे मोठे नुकसान...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
बीड जिल्ह्यात हमीभाव शेतीमाल खरेदीची...बीड : हमीदराने शेतीमाल खरेदीच्या नोंदणीत...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
भाजप सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या...बीड : आम्ही विविध भागात औद्योगिक वसाहती आणि...
पुणे जिल्ह्यातील ३१७६ हेक्टर क्षेत्राला...पुणे  ः जिल्ह्यात २५ सप्टेंबरला झालेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात होणार २३५४ पीककापणी...पुणे   ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा...
पुणे जिल्ह्यात लसीकरण पडताळणीसाठी...पुणे  : महाराष्ट्र राज्य लाळ खुरकूत रोगमुक्त...
नगर जिल्ह्यात बाराशे हेक्टरवर ज्वारी...नगर : कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरीप...सातारा  ः पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील...
रविकांत तुपकर यांचा पुन्हा `स्वाभिमानी`...कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अंतर्गत...