आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण : मुंडे

आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण : मुंडे

मुंबई : विधानपरिषदेत आजसरकारने मांडलेल्या मराठा आरक्षणाला मी व आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे, या शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयकास आज (गुरुवार) विधानसभा आणि विधानपरिषदेत एकमताने मंजुरी देण्यात आली. हे आरक्षण मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षीय आमदारांचे आभार मानले. मूळ आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) अंतर्गत राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद देण्याची शिफारस मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या कृती आराखड्यात करण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज हा आराखडा सभागृहात सादर केला.

यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, की या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या सकल मराठा समाजाचे आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com