agriculture news in marathi, Maratha Reservation challenged in Supreme court | Agrowon

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जुलै 2019

नवी दिल्ली : राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विधेयकाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मराठा आरक्षण राजकीय असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा न्यायालयात लढला जाणार आहे. 

याचिकादार वकील संजीत शुक्‍ला यांनी शुक्रवारी (ता.५) विशेष सुटीकालीन न्यायालयात याचिका दाखल केली. राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक-आर्थिक मागास गटात सरकारी नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण दिले आहे. 

नवी दिल्ली : राज्य सरकारच्या मराठा आरक्षण विधेयकाला आव्हान देणारी याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. मराठा आरक्षण राजकीय असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा न्यायालयात लढला जाणार आहे. 

याचिकादार वकील संजीत शुक्‍ला यांनी शुक्रवारी (ता.५) विशेष सुटीकालीन न्यायालयात याचिका दाखल केली. राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक-आर्थिक मागास गटात सरकारी नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण दिले आहे. 

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला असून, टक्केवारी १६ वरून १२ (शिक्षण) आणि १३ वर (नोकरी) आणण्यास सांगितले आहे. या निर्णयाच्या विरोधात शुक्‍ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. 

केंद्र सरकारच्या १०१ व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना आरक्षणाचा अधिकार असून, ५० टक्‍क्‍यांहून अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे आरक्षण रद्द करा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. आतापर्यंत मराठा समाजाचे १२ मुख्यमंत्री झाले. सहकार, शिक्षण आदी क्षेत्रांत मराठा समाज आघाडीवर आहे; मग त्यांना मागास कसे म्हणायचे, असा प्रश्‍न याचिकादारांनी केला आहे.  उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले असून, याचिकदार विनोद पाटील यांनीही कॅव्हिएट दाखल केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...