'मराठा क्रांती'च्या 'महाराष्ट्र बंद'ला मोठा प्रतिसाद

राज्यात 'महाराष्ट्र बंद'ला मोठा प्रतिसाद
राज्यात 'महाराष्ट्र बंद'ला मोठा प्रतिसाद

पुणे : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला राज्यभरात शहरांसह ग्रामिण भागात मोठा प्रतिसाद लाभला. आंदोलकांनी ठिकठिकाणी विविध मार्गांनी 'ऱास्ता रोको' आंदोलन केले. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. अनुचित घटना रोखण्यासाठी प्रशासनाने अनेक शहरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा सायंकाळपर्यंत बंद करण्यात आली. 'बंद'च्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या सेवेवर परिणाम झाला. बहुतांश भागात सेवा बंद होती. काही ठिकाणी रेल्वे सेवेवर परिणाम झाला. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांसह राज्यातील मुंबई, ठाणे सोडून सर्वच जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबई, पुण्यासह बहुतांश बाजार समित्यात बंद होत्या. शाळा, महाविद्यालये बंद होते. राज्यात आंदोलना दरम्यान सरकारच्या भुमिकेचा निषेध करण्यात आला. जोरदार घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून केले.  मराठवाड्याच्या रेल्वेवर परिणाम  औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (ता. नऊ) पुकारण्यात आलेल्या बंदचा रेल्वे सेवेवर परिणाम झाला. तीन गाड्या रद्द करण्यात आल्या. तर चार गाड्या अंशता रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे विविध रेल्वेस्थानकांवर सचखंड, तपोवन एक्‍सप्रेस, नरसापुर नांदेड या गाड्या अडकून पडल्या. 

लातूर शहरात सर्वत्र धुराचे लोट लातूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. ९) लातूर बंदचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासूनच सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी सगळे रस्ते जाम करून टाकले. त्यानंतर दुपारपासून मात्र टायर जाळण्यास सुरवात केली. त्यामुळे शहरात सर्वत्र धुराचे लोट दिसून येत होते. आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचा मूक ठिय्या  सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  नगर महामार्ग रोखला.. सावळीविहीर: येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावरील निमगाव-निघोज येथील शिर्डी बायपास मार्गावर ' एक मराठा-लाख मराठा 'ची घोषणा देत मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन एल्गार करत रास्तारोको करुन चक्का जाम केला. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रोखला अकोला : अकोल्यात मराठा आंदोलकांनी मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 रोखला. टायर जाळून रोखला राष्ट्रीय महामार्ग. महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा  लखमापूर (नाशिक) : मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले.दिंडोरी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा देण्यात आल्या.  हडपसर येथे 'महाराष्ट्र बंद'ला उत्फुर्त प्रतिसाद हडपसर : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चोने पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला हडपसरमध्ये उत्फुर्त प्रतिसाद लाभला. व्यापारी पेठा, शाळा, महाविदयालये, मदयाची दुकाने तसेच पंडीत जवाहरलाल भाजी मंडई बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कडकडीत बंद पाळल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता. मात्र रूग्ण सेवा सुरू होती. पोलादपूरमध्येही महामार्ग रोखला महाड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पोलादपूरमध्येही छत्रपती शिवरांयाच्या पुतळ्यासमोर मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर पोलादपूर शहरातून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. रत्नागिरीत एसटी, रिक्षा,शाळा बंद रत्नागिरी - मराठा क्रांती मोर्चाच्या आजच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला रत्नागिरीत चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापारी संघाने बंदमध्ये सामिल न होण्याची भूमिका बुधवारीच (ता. 8) स्पष्ट केली होती. त्यामुळे शहरातील दुकाने, टपर्‍या, हॉटेल सुरू होती. मात्र एसटी महामंडळाने सर्व फेर्‍या रद्द केल्या. रास्ता रोको आंदोलनात रूग्णवाहिकेला दिली वाट चाकुर (लातूर) - मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने क्रांतीदिनी गुरूवारी (ता. ९) पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मध्ये तालूक्यातील सर्व गावातील नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला, रस्त्यावर एकही वाहन नाही, दुकाने, शाळा, महाविद्यालय, बँका बंद असल्यामुळे सर्वत्र संचारबंदीसारखी परस्थिती निर्माण झाली आहे.  चिपळुणात कडकडीत बंद चिपळूण - महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज चिपळूण तालुक्यात मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतुकीसह खासगी वाहतूक, पेट्रोल पंप व सर्व दुकाने बंद राहिली. शहरातून मोर्चा काढून एक मराठा, लाख मराठ्याच्या घोषणा दिल्याने शहर परिसर दुमदुमले. भगवे ध्वज हाती घेत काढलेल्या मोर्चाने शहर परिसरात भगमेवय वातावरण झाले होते. यवतमाळ जिल्ह्यात एसटीच्या 1200 फेर्‍या रद्द यवतमाळ  : क्रांतिदिन पुकारण्यात आलेल्या बंदला यवतमाळ जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. बंद अत्यंत शांततेत करण्यात आला. सकाळपासून नऊ आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही. दिवसभरात एसटी महामंडळाच्या एक हजार 200 फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून एसटीचे 40 लाखांचे उत्पन्न घटले. पाटण : तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन पाटण (सातारा) - सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या प्रमुख मागणी सह इतर मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलनाची सुरुवात येथील तहसिल कार्यालयासमोर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या बांधवांनी केली. शिरूर अनंतपाळ तालुक्यात रस्ता रोको शिरूर अनंतपाळ (जि.लातूर) : शिरुर अनंतपाळसह तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यावर मराठा समाजाकडून आरक्षण मागणीसाठी चक्काजाम रस्ता रोको अंदोलन करीत शहरासून अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला. घोणसी, जळकोट, तिरुका येथे बंद जळकोट (लातूर) - जळकोट शहरासह तालुक्यातील घोणसी, तिरुका, चेरा, गुरुवारी (ता. 9) सकाळपासून सकल मराठा बांधवाकडून शहरातील शिवाजी चौक येथून ते बसस्थानका पर्यत मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कुणकी  चौकात आल्यावर आंदोलकांनी सराकरच्या विरुद्धात घोषणा देत सर्व वाहनांना अडविण्यात आले. शहरातील सर्व दुकाने बंद ठेऊन सर्व धर्मियांनी या आंदोलनाला पाठिंबाच दिल्याचे दिसून येत आहे. पातूरला कडकडीत बंद अकोला: आलेगाव तालुका पातूर येथे सकल मराठा समाजच्या वतीने  मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता व इतर मागण्या करीता आलेगाव येथे संपूर्ण मार्केट कडक़डीत बंद करण्यात आली. आलेगाव येथे अकोला मेहकर राज्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यानी ठिय्या आंदोलन केले. गावातील सर्व समाजातील लोकांनी मराठ्याचा आरक्षण करीता पाठिंबा दिला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com