agriculture news in marathi For Maratha reservation Morcha on 4th July in Solapur | Page 3 ||| Agrowon

मराठा आरक्षणासाठी सोलापुरात ४ जुलैला मोर्चा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

सोलापूर ः ‘‘आता मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर आक्रमक मोर्चे काढण्यात येतील. त्याची सुरवात ४ जुलै रोजी सोलापुरातून करणार आहे’’, अशी माहिती माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर ः ‘‘मराठा आरक्षणप्रश्नी समाज बांधवांनी मूक मोर्चे काढले. परंतु सरकारला याची जाण नाही. त्यामुळे काही साध्य झाले नाही. म्हणून आरक्षण मिळवण्यासाठी आता मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर आक्रमक मोर्चे काढण्यात येतील. त्याची सुरवात ४ जुलै रोजी सोलापुरातून करणार आहे’’, अशी माहिती माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पाटील म्हणाले, ‘‘या मोर्चासाठी खासदार संभाजीराजे, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह आमदार आणि खासदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. जे मोर्चात सहभागी होतील, तेही आमचे आणि जे सहभागी नाहीत, तेही आमचेच. आम्ही कोणाला विरोध करणार नाही. आमच्या आक्रमकतेवरून जर कोणी आमचे पुतळे जाळतील तर जाळावेत. प्रत्येकाचे आपापले विचार आहेत.’’ 

‘‘माझे वडील काँग्रेस, तर मी राष्ट्रवादीतून आमदार झालो. ज्यांना माझ्याबद्दल माहिती नाही, असे लोक मला भाजपशी जोडत आहेत. मी राजकीय व्यक्ती नसून समाज बांधव म्हणून आरक्षणप्रश्नी मैदानात उतरलो आहे. २५ जून रोजी मुंबईत गोलमेज परिषद होईल. तिन्ही राजे, मंत्री रामदास आठवले, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह अनेक आमदार आणि खासदार येणार आहेत’’, असे पाटील यांनी सांगितले.


इतर बातम्या
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...