आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
ताज्या घडामोडी
मराठा विश्वभूषण पुरस्कार मंत्री राजेश टोपे यांना प्रदान
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवदिनी मराठा सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा ‘मराठा विश्वभूषण’ हा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार यंदा कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रदान करण्यात आला.
सिंदखेडराजा जि. बुलडाणा : राजमाता जिजाऊ जन्मोत्सवदिनी मराठा सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा ‘मराठा विश्वभूषण’ हा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार यंदा कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रदान करण्यात आला.
जिजाऊ सृष्टीवर मंगळवारी (ता.१२) झालेल्या या सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पुरुषोत्तम खेडेकर, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, माजी आमदार रेखाताई खेडेकर, आमदार श्वेता महाले, चंद्रशेखर शिखरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, मधुकर मेहकरे, ॲड. नाझेर काझी उपस्थित होते.
सोहळ्यात पालकमंत्री डॉ. शिंगणे, खेडेकर यांच्या हस्ते राजेश टोपे यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शाहीर भूषण सम्राट पुरस्काराने शाहीर रामदास कुरंगळ आणि जिजाऊ पुरस्काराने दिल्ली येथे कार्यरत आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर टीका केली. शेतकऱ्यांची भूमिका समजून न घेता त्यांच्यावर कायदे लादण्याचा केंद्राचा अट्टाहास हा देशातील लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या शेतकरी कायद्यांना स्थगिती दिल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे अभिनंदन केले.
प्रथमच जिजाऊ जन्मोत्सव सोहळा हा ऑनलाइन पद्धतीने झाला. जिजाऊ सृष्टीवर प्रातिनिधिक स्वरूपात मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना टोपे यांनी हा पुरस्कार कोरोना काळात झटलेल्यांना समर्पित केला. डॉ. शिंगणे, मनोज आखरे, आमदार महाले यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अर्जुनराव तनपुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले.