मराठवाड्यात १२०२ उमेदवारांचे १९०४ अर्ज

मराठवाड्यात १२०२ उमेदवारांचे १९०४ अर्ज
मराठवाड्यात १२०२ उमेदवारांचे १९०४ अर्ज

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात १२०२ उमेदवारांनी १९०४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी (ता. ५) या अर्जांची छाननी होईल. ७ ऑक्‍टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असल्याने त्यानंतरच निवडणूक रिंगणातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

मराठवाड्यातील विधानसभेची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरण्याची चिन्ह आहेत. आधी पक्षप्रवेशाची लाट व नंतर उमेदवारी जाहीर करण्याच्या घडामोडीनंतर घडलेल्या धक्‍कादायक राजकीय घडामोडीने मराठवाड्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ साठी अर्ज दाखल करण्याची ४ ऑक्‍टोबर ही अखेरची तारीख होती. या तारखेत शेवटच्या क्षणापर्यंत नांदेड जिल्ह्यातील ९ मतदारसंघात ४३० उमेदवारांनी सर्वाधिक ४९२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ९ मतदारसंघात २४७ उमेदवारांनी ३४४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

लातूर जिल्ह्यातील ६ मतदारसंघात १३५ उमेदवारांनी १८७, उस्मानाबाद जिल्ह्यातील चार मतदारसंघात ९१ उमेदवारांनी १३८, बीड जिल्ह्यातील ६ मतदारसंघात २०३ उमेदवारांनी ३१७, परभणी जिल्ह्यातील ४ मतदारसंघात ८८  उमेदवारांनी १२५, हिंगोली जिल्ह्यातील ३ मतदारसंघात  ५८ उमेदवारांनी ८४, तर जालना जिल्ह्यातील ५ मतदारसंघात १५० उमेदवारांनी २१७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

प्रमुख राजकीय पक्षांसह इतर इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या अर्जाची रेलचेल मराठवाड्यात पहायला मिळते आहे. प्रत्यक्षात छाणणीत कुणाचे अर्ज बाद होतात का?, ७ ऑक्टो‍बरनंतर निवडणुकीच्या रिंगणात कोण उरते ? त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल. शिवाय तूर्त काही मतदारसंघात दिसत असलेले बंडाचे निशानही किती ताकदवान ठरेल, याचेही चित्र स्पष्ट होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com