मराठवाड्यात अद्यापही २९ टक्केच उपयुक्‍त पाणी

मराठवाड्यात २९ टक्के उपयुक्‍त पाणी
मराठवाड्यात २९ टक्के उपयुक्‍त पाणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा २९.२० टक्‍क्‍यांवर आला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रकल्पातींल ४०.२५ टक्‍के, मध्यम प्रकल्पांतील ७.३२ टक्‍के, लघू प्रकल्पांतील ७.५८ टक्‍के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमधील ३८.१९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठ्याचा समावेश आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली. तेरणा, मांजरा, रेणा नद्यांवरील २४ बंधाऱ्यांत अजूनही उपयुक्‍त पाण्याची प्रतीक्षा असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. 

जलसंपदा विभागाच्या ३० ऑगस्टअखेरच्या अहवालाने अर्धाअधिक पावसाळा लोटल्यानंतरही मराठवाड्यातील प्रकल्पांची समोर आलेली स्थिती चिंता वाढविणारी आहे. या अहवालानुसार मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडीत ८५ टक्‍के, उध्‍‌र्व पेनगंगामध्ये १५ टक्‍के, निम्न मनारमधये २५ टक्‍के, तर विष्णूपुरीत ४७ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. येलदरी, सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना व सिनाकोळेगाव प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नव्हता.

मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत ९ टक्‍के, जालनामधील ७ प्रकल्पांत २१ टक्‍के, बीडमधील १६ प्रकल्पांत १ टक्‍का, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत १ टक्‍का, नांदेडमधील ९ प्रकल्पांत २३ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा झाला होता. ७४९ लघू प्रकल्पांपैकी औरंगाबादमधील ९३ प्रकल्पांत १५ टक्‍के, जालनामधील ५७ प्रकल्पांत १ टक्‍का, लातूरमधील १३२ प्रकल्पांत २ टक्‍के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत १ टक्‍का, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ३४ टक्‍के, परभणीमधील २२ प्रकल्पांत ५ टक्‍के, तर हिंगोलीमधील २६ लघू प्रकल्पांत ३४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा झाला होता. 

मध्यम ७५ पैकी ३१ प्रकल्प कोरडेठाक, तर २८ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली होते. लघू प्रकल्पांपैकी ३२८ प्रकल्प कोरडेठाक, तर २६० प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली होता, अशी माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली. अलीकडे ३१ ऑगस्टनंतर आलेल्या पावसानेही काही प्रमाणात पाणीसाठ्यात वाढ होण्याचीही शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com