मराठवाड्यातील २९८ मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

मराठवाड्यातील २९८ मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस
मराठवाड्यातील २९८ मंडळांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी तब्बल २९८ मंडळांमध्ये शनिवारपर्यंत (ता. २८) अपेक्षित सरासरीच्या तुलनेत पाऊस झालेला नाही. यामधील ५४ मंडळात तर सरासरीच्या ५० टक्‍केदेखील पावसाची नोंद झालेली नाही. ९ मंडळात शनिवारपर्यंत ३० टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, खुल्ताबाद, नांदेड जिल्ह्यांतील देगलूर व बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यात सरासरीच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झालेला नाही. औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी केवळ ८ मंडळात सरासरीच्या पुढे जावून पाऊस झाला. ५७ मंडळात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामध्येही १७ मंडळात सरासरीच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झालेला नाही. जालना जिल्ह्यातील ४९ मंडळांपैकी ४५ मंडळात अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. केवळ चार मंडळात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३९ पैकी ३० मंडळात अपेक्षित पाऊस नाही.

केवळ ९ मंडळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी १८ मंडळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, तर १२ मंडळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ८० मंडळांपैकी ३७ मंडळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. ४३ मंडळात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील एका मंडळात तर सरासरीच्या ३० टक्‍केही पाऊस झाला नसल्याची नोंद झाली आहे.

बीड जिल्ह्यातील ६३ मंडळांपैकी ५४ मंडळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यातही १६ मंडळात सरासरीच्या तुलनेत ५० टक्‍केही पाउस झालेला नाही. लातूर जिल्ह्यातील ५३ मंडळांपैकी २७ मंडळात आजपर्यंत सरासरीपेक्षा अधिक तर २६ मंडळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२ मंडळांपैकी तब्बल ३१ मंडळात अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नाही. ११ मंडळात आजपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com