मराठवाड्यात ३.२० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा

मराठवाड्यात ३.२० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा
मराठवाड्यात ३.२० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा

औरंगाबाद : मराठवाड्यात जुलैच्या मध्यानंतर पडलेल्या पावसामुळे प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांमधील ०.८० टक्‍क्‍यांपर्यंतचा उपयुक्‍त पाणीसाठा ऑगस्टच्या सुरवातीला ३.२० टक्‍क्‍यांवर पोचला आहे.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, विष्‍‌णुपुरी, निम्न दुधना, सिनाकोळेगाव आदी प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणी नाही. जायकवाडीतील उपयुक्‍त पाणीसाठा ७ टक्‍क्‍यांवर आला होता.

नांदेड जिल्ह्यातील निम्न प्रकल्पांमध्ये १० टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. ७४९ लघुप्रकल्पांमध्ये केवळ २ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ प्रकल्पांत ८ टक्‍के, बीडमधील १२६, उस्मानाबादमधील २०५ व हिंगोली जिल्ह्यातील २६ प्रकल्पांत जिल्हानिहाय केवळ १ टक्‍काच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे.  जालना जिल्ह्यातील ५७ व परभणी जिल्ह्यातील २२ लघुप्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंबही नाही.

नांदेड जिल्ह्यातील ८८ लघुप्रकल्पांत ५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १६ प्रकल्पांत ५ टक्‍के, जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत २१ टक्‍के, बीडमधील १६ प्रकल्पांत १ टक्‍के; तर नांदेड जिल्ह्यातील ९ प्रकल्पांत ५ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. लातूरमधील ८, उस्मानाबादमधील १७; तर परभणी जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पांत उपयुक्‍त नाही.

 मराठवाड्यातील लघू, मध्यम प्रकल्पांपैकी ३८८ प्रकल्प अजूनही कोरडे आहेत. औरंगाबाद, बीडमधील प्रत्येकी ८, जालन्यातील १, उस्मानाबादमधील १० प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. औरंगाबादमधील ५०, जालना ३९, बीड ९५, लातूर ४६; तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १३० मध्यम प्रकल्प कोरडे आहेत.  मराठवाड्यातील ७५ मध्यम व ७४९ लघुप्रकल्पांपैकी ३३७ प्रकल्पांमधील पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच आहे.

औरंगाबादमधील ५ प्रकल्पांसह जालन्यातील ४, बीड, लातूर, उस्मानाबादमधील प्रत्येकी ७, नांदेडमधील ५ व परभणीमधील २ प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. औरंगाबादमधील ३१, जालना १७, बीड २३, लातूर ७७, उस्मानाबाद, नांदेड प्रत्येकी ५७, परभणी व हिंगोलीमधील प्रत्येकी २१ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com