agriculture news in marathi, Marathwada in 4 thousand 3 hundred 92 acher on Mulberry plantations | Agrowon

मराठवाड्यात ४३९२ एकरांवर तुतीची लागवड

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा आजपर्यंत ४ हजार ३९२ एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. यंदा तुती लागवडीसाठी मराठवाड्याला ३७०० एकरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पावसाचा खंड असूनही मराठवाड्याने तुती लागवडीसाठी मिळालेले उद्दिष्ट पार केले आहे. यावरून रेशीम उद्योग मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारा वाटत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा आजपर्यंत ४ हजार ३९२ एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. यंदा तुती लागवडीसाठी मराठवाड्याला ३७०० एकरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पावसाचा खंड असूनही मराठवाड्याने तुती लागवडीसाठी मिळालेले उद्दिष्ट पार केले आहे. यावरून रेशीम उद्योग मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारा वाटत असल्याचे अधोरेखित झाले आहे.

महारेशीम अभियानातून केलेल्या प्रयत्नांचीही त्याला जोड मिळाली आहे. आजपर्यंतच्या एकूणच लागवडीत औरंगाबाद जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात ११२१ एकरवर तुतीची लागवड झाली असून, त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ८३३ एकर, जालना जिल्ह्यात ७०१ एकर, उस्मानाबाद जिल्ह्यात ४५१ एकर, लातूर जिल्ह्यात ४४२ एकर, हिंगोली जिल्ह्यात ३८८ एकर, नांदेड जिल्ह्यात २५१ एकर तर परभणी जिल्ह्यात २०५ एकरावर तुतीची लागवड करण्यात आली आहे. आणखी किमान दोन हजार एकरवर तुतीची लागवड होणे अपेक्षित आहे. सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना तुतीची लागवड करून उत्पादन घेता येणे शक्‍य आहे.

महारेशीम अभियानाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ११ हजार ८३ एकर क्षेत्राची तुती लागवडीसाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी ८१३८ एकर क्षेत्र तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ८११५ एकर प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आले. त्यापैकी ६५४९ एकरवर तुती लागवड करण्याला प्रशासकीय मंजुरात मिळाली. त्यापैकी सुरवातीच्या टप्प्यात ३८४० एकरवर तुती लागवडीला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्या तुलनेत १ ऑगस्ट अखेरपर्यंत ४३९२.७५ एकरवर तुतीची लागवड करण्यात आली. यामध्ये मनरेगांतर्गत लागवड झालेल्या ४०३४ एकरसह मनरेगा व्यतिरिक्‍त लागवड झालेल्या ३५८.२५ एकरचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पावसाच्या खंडाने घातला खोडा

मराठवाड्यातील तुती लागवडीत पावसाने खोडा घातला आहे. शिवाय सोनपेठ, पालम, उमरगा व देगलूर या चार तालुक्‍यांत अजून तुती लागवड झाली नाही. औरंगाबादमधील पैठण, गंगापूर, वैजापूर आदी तालुक्‍यांमधील तुती लागवडीलाही ब्रेक लागला आहे.

जवळपास अडीच कोटी रोपांची लागवड
आठही जिल्ह्यात सुमारे अडीच कोटी रोपांची लागवड केली आहे. यामध्ये औरंगाबाद ६१ लाख ६५ हजार ५००, जालना ३८ लाख ५५ हजार ५००, बीड ४५ लाख ८१ हजार ५००, उस्मानाबाद २४ लाख ८० हजार ५००, लातूर २४ लाख ३१ हजार, परभणी ११ लाख २७ हजार ५००, हिंगोली २१ लाख ३४ हजार, तर नांदेड जिल्ह्यात झालेल्या १३ लाख ८४ हजार ६२५ तुती रोपांचा समावेश आहे. 

शेतकऱ्यांचे रेशीम उत्पादन वाढविण्यासोबतच उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न राहील. तूर्त शेतकऱ्यांना रेशीम हा एकमेव पर्याय उत्पन्न दुप्पट करण्यास हातभार लावणारा ठरल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात याकडे आकृष्ट झाले आहेत.
- दिलीप हाके, सहायक संचालक (रेशीम), औरंगाबाद, मराठवाडा


इतर बातम्या
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात कृषी...औरंगाबाद : मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी, नांदेड, हिंगोलीत निविष्ठा...परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...