Agriculture news in marathi In Marathwada, cotton was blackened and soybean was destroyed | Agrowon

मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आधी मूग आता उडीद, सोयाबीन व कपाशीचे पीक संकटात आहे.

औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आधी मूग आता उडीद, सोयाबीन व कपाशीचे पीक संकटात आहे. कपाशीची बोंडे काळवंडी आहेत, तर मोड फुटून उडीद, सोयाबीन नासले आहे. अनेक शेतशिवारात पाणीच पाणी साचले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ६१, जालना जिल्ह्यातील ४६, बीड जिल्ह्यातील ५३, उस्मानाबाद मधील ३५, तर लातूर जिल्ह्यातील ५० मंडळांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ६, औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी एक मिळून ८ मंडळांत अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यात अनेक मंडळांत पावसाने कहर केला. तीच परिस्थिती इतरही जिल्ह्यातील अनेक गाव शिवारातील शेतात होती. पाणी साचल्याने पिके धोक्यात आली. तर, कुठे नदी, ओढ्यांच्या पुरामुळे पिकांना फटका बसला.

जालना जिल्हा ः जालना ग्रामीण ५६.५, विरेगांव ५०.८, गोंदी ४६.८,वडीगोदरी ४४.८, आष्टी २३.३,श्रीष्टि ५८.५, घनसावंगी ५२, रांजनी ५५.८, तळणी २४.८.
लातूर जिल्हा ः उजनी ३९.५,अंधोरी ५७.८, नीटूर २४.५, कासारबालकुंदा ३८.८,कासारसिरसी ३४, नळगिर २१.५ हेर २२.३, देवनी २५.३,घोंसी २४.३

उस्मानाबाद ः उस्मानाबाद ग्रामीण ५०.८, केशेगाव ६१.३, तुळजापूर ३९.३ ,सलगरा ५३.३, सावरगाव ३९.३ ,मंगरूळ ४६.३, इटकळ ५५, नळदुर्ग ३९.३, भूम ३०.८,ईटकुर २०.३, येरमाळा ५४.३, उमरगा २०.५, डाळिंब २३.३.

बीड ः गेवराई ५६.३, शिरसाळा २८.३, मुखेड २१.३,
औरंगाबाद ः चौका ३०, अजिंठा ३७, अंभई २९, आमठाणा ३३, सावळदबारा ३९, शेंदूरवादा ३२.

अतिवृष्टीची मंडळे (मि.मी)

जालना शहर ८७ 
रामनगर  ६७.७५ 
पाचनवडगाव ८०.५० 
धनगर पिंपरी ८१.७५ 
ढोकसाळ ७६.५० 
पांगरी  ८४
पाचेगाव ७५.२५
चिंचोली लिंबाजी  ७१

 


इतर अॅग्रो विशेष
‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...
खाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...
कांदा लिलाव अखेर सुरूनाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू...
केंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क...नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे...
कांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
सांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८०...सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...
मोसंबी फळपिक विमा अर्जात गारपीटीचा कॉलम...पुणे ः आंबिया बहारातील मोसंबी, डाळिंब,...
पुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंयसोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो,...
गुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...
स्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...
धुके पडण्यास प्रारंभ...पुणे ः परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
मोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...
देखो तो कहीं चुनाव है क्या?‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...
कांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...
मराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...
कंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...
इथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...
एक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...
कापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...
फळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...