मराठवाड्यातील कोरड्या पडणाऱ्या प्रकल्पांची संख्या वाढली

 Marathwada in dams storage Empty
Marathwada in dams storage Empty

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा उन्हाच्या तीव्रतेसोबतच पाण्याचे संकटही डोके वर काढण्याची चिन्हे आहेत. गत आठवडाभरात एक मध्यम व दोन लघुप्रकल्प कोरडे पडल्याने कोरड्या पडलेल्या लघू-मध्यम प्रकल्पांची संख्या ७५ वर पोचली आहे. दुसरीकडे ११ मध्यम व १३५ लघुप्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली असल्याने पाण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

मराठवाड्यातील प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याकडे कोरडे पडणारे प्रकल्प दिशानिर्देश करीत आहे. एकूण ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ५ प्रकल्प कोरडे पडले आहेत. कोरड्या पडलेल्या प्रकल्पात औरंगाबाद व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पासह बीड जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये जालना व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रकल्पासह औरंगाबादमधील चार व बीडमधील दोन प्रकल्पांचा समावेश आहे. 

मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी तब्बल ७० लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. कोरड्या पडलेल्या लघुप्रकल्पांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २३, जालनामधील ६, बीडमधील २४, लातूरमधील ९ व उस्मानाबादमधील ८ लघुप्रकल्पांचा समावेश आहे. लघुप्रकल्पांपैकी तब्बल १३५ लघुप्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील ६, जालन्यातील १६, बीडमधील २१, लातूरमधील ३८, उस्मानाबादमधील ४८, नांदेडमधील ३, परभणीमधील ४ प्रकल्पांचा समावेश आहे. 

केवळ ९९ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपुढे साठा मराठवाड्यातील मोठ्या, लघू, मध्यम प्रकल्पांपैकी केवळ ९९ प्रकल्पांतच ७५ टक्‍क्‍यांपुढे पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद, बीड, नांदेड व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका मोठ्या प्रकल्पात ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी औरंगाबादमधील ६, जालनामधील २, बीडमधील ३, लातूर, परभणी, उस्मानाबादमधील प्रत्येकी १ तर नांदेडमधील ४ मिळून १८ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. ७४९ लघु प्रकल्पांपैकी केवळ ७७ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. त्यामध्ये बीड व नांदेडमधील प्रत्येकी १७, लातूरमधील १८, परभणीमधील ३, हिंगोलीतील १, उस्मानाबादमधील ७, जालनामधील ६, औरंगाबादमधील ८ लघुप्रकल्पांचा समावेश आहे.

दीडशेवर प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी साठा मराठवाड्यातील ७५ मध्यम व ७४९ लघुप्रकल्पांपैकी तब्बल १६२ प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा असलेल्या प्रकल्पांमध्ये १४५ लघू व १७ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. जालना व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी १८, लातूरमधील १९, औरंगाबादमधील ११, उस्मानाबादमधील सर्वाधिक ६०, नांदेडमधील ७, परभणीतील १०; तर हिंगोलीतील २ लघुप्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील २, जालनामधील १, बीडमधील ५, लातूरमधील ४ व उस्मानाबादमधील सहा मध्यम प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com