agriculture news in marathi In Marathwada, the economic mathematics of the farmers is on the trumpet | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात तुरीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात नुकसान केले. उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त फटका बसला. त्यानंतर आता शेतकऱ्यांची सारी भिस्त तुरीच्या पिकावरच अवलंबून आहे.

औरंगाबाद : यंदा अतिपावसाने उडीद, सोयाबीनचे अतोनात नुकसान केले. उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त फटका बसला. त्यानंतर आता शेतकऱ्यांची सारी भिस्त तुरीच्या पिकावरच अवलंबून आहे. ढगाळ वातावरणाचे तुरीवरील संकट पाहता या पिकातून पदरात काय पडते, त्याला बाजारात दर काय मिळतो? यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असणार आहे. 

कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार मराठवाड्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ९७ हजार ६०० हेक्‍टर होते. त्या  तुलनेत प्रत्यक्षात ४ लाख ७० हजार ४७० हेक्‍टर २५ गुंठ्यावर तुरीचे पेरणी झाली. जालना, बीड व नांदेड या तीन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे, तर हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, औरंगाबाद आदी जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७५ ते ९४ टक्‍के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली. 

लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना जिल्हे तुरीचे आगर मानले जातात. यंदा प्रत्यक्ष तुरीची पेरणी झालेल्या क्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील ३० हजार २८८ हेक्‍टर, जालना ५० हजार ३३४ हेक्‍टर, बीड ६१ हजार ३०८ हेक्‍टर, लातूर ८८ हजार ९२० हेक्‍टर, उस्मानाबाद ७६ हजार ६४३ हेक्‍टर, परभणी ४६ हजार २७४ हेक्‍टर, हिंगोली ४४ हजार ६३९ हेक्‍टर, तर नांदेड जिल्ह्यातील ७२ हजार ६३ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. यंदासाठी शासनाने तुरीसाठी ६ हजार रुपये प्रतिक्‍विंटलचा दर जाहीर केला आहे. २०१६-१७ मध्ये हा दर ५०५० रुपये प्रतिक्‍विंटल होता. 

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार अंतिम क्षेत्र व प्रत्यक्ष क्षेत्र याचा गोंधळ होता कामा नये. खरेदीसाठीच्या उत्पादकतेचे गणित सुधारित वाणाच्या प्रत्यक्ष उत्पादकतेचा विचार करून बसवावे. खरेदी केंद्राची संख्या निश्‍चित करावी. तुरीचे चांगले उत्पादन येण्याची आशा आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर तूर हमी दरापेक्षा कमी दराने विकण्याची वेळ येवू नये, यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे. 

सोयाबीन, मूग, उडदासह कापूसही गेल्यात जमा आहे. तुरीच्या पिकांकडून मोठी आशा आहे. त्यावरही कीड रोगांचं संकट आहेच. हमी दरापेक्षा कमी दराने तूर विकण्याची वेळ येवू नये. त्यासाठी शासनाने नियोजन करावं.
- संजय मोरे, शेतकरी नळविहिरा, ता. जाफराबाद, जि. जालना. 

सुधारित वाणांचा वापर होते. त्यामुळे एकरी उत्पादकता त्यानुसार धरली जावी. त्यानुसार खरेदीचं नियोजन करावं.  अन्यथा, शेतकऱ्यांची अडचण होईल. 
- संदीप लोंढे, शेतकरी, शेवगळ,  ता. घनसावंगी जि. जालना. 

खरेदीतील किचकट पद्धतीला शेतकऱ्यांना 
सामोरे जावे लागू नये. चांगल्या उत्पादनाची आशा आहे. निदान यंदा तरी खरेदीच्या प्रक्रियेत अडचणी येवू नये.
- बळिराम होटकर, शेतकरी, विहामांडवा, ता. पैठण, जि. औरंगाबाद.


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
शेतकरी नियोजन पीक - ज्वारीज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत...
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...