Agriculture news in marathi, In Marathwada at the end of October, about 64% of useful water | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात ऑक्‍टोबरअखेर ६४ टक्‍क्‍यांवर उपयुक्‍त पाणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ऑक्‍टोबरअखेर ६३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. ११ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ७२ टक्‍क्‍यांवर आहे. तरीही ७५ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणी ४७ ठक्‍के, लघू प्रकल्पांत ४१ टक्‍केच आहे. दुसरीकडे गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांत ८५ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांत ७९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ऑक्‍टोबरअखेर ६३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. ११ मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ७२ टक्‍क्‍यांवर आहे. तरीही ७५ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणी ४७ ठक्‍के, लघू प्रकल्पांत ४१ टक्‍केच आहे. दुसरीकडे गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांत ८५ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांत ७९ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जलसंपदा विभागाच्या १ नोव्हेंबर अखेरच्या अहवालानुसार, ११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी, निम्न मनार, विष्‍‌णुपुरी हे तीन्ही प्रकल्प तुडुंब आहेत. दुसरीकडे येलदरीत ६०, टक्‍के, माजलगावमध्ये ७१ टक्‍के, ऊर्ध्व पैनगंगामध्ये ५९ टक्‍के, निम्न तेरणामध्ये ३२ टक्‍के, तर निम्न दुधनामध्ये ८ टक्‍केच उपयुक्‍त पाणी होते. सिद्धेश्‍वर, मांजरा व सीना-कोळेगाव प्रकल्पांना उपयुक्‍त पाणीसाठ्याची प्रतीक्षाच होती. ७५ मध्यम प्रकल्पांची व लघू प्रकल्पांची स्थिती ऑक्‍टोबरअखेरपर्यंतच्या आणि आताच्या जोरदार ते अतिजोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ४० टक्‍क्‍यांवर पोचला आहे. जालना जिल्ह्यातील ७ प्रकल्पांत ३६ टक्‍के, बीडमधील १६ प्रकल्पांत ३४ टक्‍के, लातूरमधील ८ प्रकल्पांत २३ टक्‍के, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ४१ टक्‍के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत सर्वाधिक ९९ टक्‍के, तर परभणीमधील २ मध्यम प्रकल्पांत ७१ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. मध्यम प्रकल्पांप्रमाणेच लघू प्रकल्पांची स्थितीही बऱ्यापैकी सुधारली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत ४४ टक्‍के, जालनामधील ५७ प्रकल्पांत १६ टक्‍के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ३६ टक्‍के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ४७ टक्‍के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत ३० टक्‍के, नांदेडमधील २२ प्रकल्पांत ७७ टक्‍के, परभणीतील २२ प्रकल्पांत ४० टक्‍के, तर हिंगोली जिल्ह्यातील २६ लघू प्रकल्पांत ८५ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे. हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील स्थितीही चांगली आहे. 

मध्यम, लघू प्रकल्पांची स्थिती बिकट

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ६ मध्यम व ६७ लघू प्रकल्पांत ऑक्‍टोबरअखेरपर्यंत पाण्याचा थेंबही साठला नव्हता. औरंगाबाद जिल्ह्यातील १ व बीडमधील ५ मिळून सहा मध्यम प्रकल्पांच्या घशाला कोरडच होती. दुसरीकडे ६७ लघू प्रकल्पांत पाणीच साठले नव्हते. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २१, जालनामधील २, बीडमधील २७, लातूरमधील ९, उस्मानाबादमधील ८ प्रकल्पांचा समावेश आहे.


इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...