agriculture news in Marathi, Marathwada in Livestock Hunger | Agrowon

मराठवाड्यात चाराटंचाईने पशुधनाची अाबाळ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : पावसाने मारलेल्या दडीने केवळ पीकच नाही तर मुक्‍या जनावरांचीही अोंबाळ सुरू आहे. अर्धपोटी राहून जनावरं जगविण्याची पाळी मालकांवर आली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, वैजापूर तसेच जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद भोकरदन, बीड जिल्ह्यातील आष्टी, धारूर, शिरूर कासार, परळी, वडवणी, लातूर जिल्ह्यातील जळकोट, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यात पावसाची स्थिती बिकट आहे. जालना जिल्ह्यात पशुधनाच्या तुलनेत ८२ दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. 

औरंगाबाद : पावसाने मारलेल्या दडीने केवळ पीकच नाही तर मुक्‍या जनावरांचीही अोंबाळ सुरू आहे. अर्धपोटी राहून जनावरं जगविण्याची पाळी मालकांवर आली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, वैजापूर तसेच जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद भोकरदन, बीड जिल्ह्यातील आष्टी, धारूर, शिरूर कासार, परळी, वडवणी, लातूर जिल्ह्यातील जळकोट, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍यात पावसाची स्थिती बिकट आहे. जालना जिल्ह्यात पशुधनाच्या तुलनेत ८२ दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. 

औरंगाबाद जिल्ह्यात त्यावेळी साडेतीनशे दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. हिंगोली जिल्ह्यात १२२ दिवस, बीड जिल्ह्यात १३० दिवस, परभणी जिल्ह्यात ११४ दिवस, नांदेड जिल्ह्यात २०८ दिवस, उस्मानाबाद जिल्ह्यात २९४ दिवस तर लातूर जिल्ह्यात २६८ दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले होते. चारा उगवला नसल्याने जायकवाडी कॅनॉल पट्‌टा नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर भागातून ऊस २५०० ते ३००० रुपये प्रतिटनाने विकत घेण्याची वेळ आली आहे.

माझ्याकडे पाच जनावरे, काही साठवलेला चारा व काही ऊस असं सध्या जनावरांना खाऊ घालणं सुरू आहे. दहा दिवसाला एक टन ऊस चारा म्हणून विकत घेतो. त्याला कधी तीन हजार, तर कधी पस्तीसशे रुपये मोजावे लागतात.
- नारायण पिवळ, शेतकरी, आडूळ, ता. पैठण

आमच्याकडं पंधरा जनावरं, एक टन चारा सहा सात दिवस कसाबसा पुरवतोय. एका जनावराला एक पाटी (५ ते ६ किलो) उसाची कुट्‌टी सकाळी व संध्याकाळी, जोडीला थोडाबहुत इतर वाळलेला चारा असतो. पण चाऱ्याअभावी जनावरं जगविण्यासाठी कसरत सुरू आहे.
- गोकूळ बनकर, शेतकरी लाखगंगा, ता. वैजापूर. 

चार जनावरांसाठी एक टन उसाचा चारा दहा दिवस पुरवितो, चारा मिळतोच कुठं. श्रीारामपूर भागातून येणारा ऊसही किती दिवस पुरलं हे सांगता येत नाही. आजच एका शेतकरी मित्राकडून एक उसाची मोळी उसनी घेतली. पावसानं सारा घोर केला. 
- राजेंद्र तुरकने, शेतकरी, लाखगंगा, ता. वैजापूर. 
 

इतर अॅग्रो विशेष
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...
विषबाधेबाबत गांभीर्य कधी?घटना क्रमांक १ ः तारीख - ४ मे २०१९, ठिकाण -...
समवर्ती लेखापरीक्षणातूनच टळतील...इ.स. पूर्व सहाव्या शतकापूर्वी प्राचीन इजिप्शियन...
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...