मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात 

मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात

औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे, या हेतूने जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने महारेशीम अभियान २०१९ राबविण्याला सोमवारी (ता. १७) सुरवात करण्यात आली. त्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने रेशीम रथाची निर्मिती करण्यात आली आहे. या रथाला जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा प्रारंभ केला. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही अशाच प्रकारे महारेशीम अभियानाला सुरवात करण्यात आली. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात चित्ररथाची फीत कापून जिल्हाधिकारी श्री. चौधरी यांनी रथाला हिरवी झेंडी दाखवली. या वेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक डी. ए. हाके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी. के. सातदिवे, प्रकल्प अधिकारी आर. एस. माने, एम. पी. साळुंखे, कीर्ती नागरगोजे आदींसह रेशीम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

सुरवातीला श्री. चौधरी यांचे श्री. हाके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. हा रेशीम रथ २९ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील तालुका तालुक्‍यात शेतकऱ्यांना तुती रेशीम शेती उद्योगाबाबत माहिती देणार आहे. २०१९ साठी शेतकऱ्यांची नोंदणीदेखील या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. औरंगाबाद विभागातील प्रत्येक तांत्रिक अधिकाऱ्याला रेशीम उद्योग विस्तारासाठी जवळपास ५० एकर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली. नागपूर येथे नुकतीच महारेशीम अभियानाची वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली. या वेळी राज्य स्तरावर दुसरा क्रमांक पटकाविला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com