मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पांत ३५ टक्केच उपयुक्त पाणी
मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पांत ३५ टक्केच उपयुक्त पाणी

मराठवाड्यातील मध्यम प्रकल्पांत ३५ टक्केच उपयुक्त पाणी

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा जवळपास निम्म्यावर आला आहे. दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा ३५.३७ टक्‍क्‍यांवर, तर ७४९ लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा केवळ २६.२३ टक्‍क्‍यांवर आला आहे. 

मराठवाड्यातील ८७३ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्‍त पाणीसाठा ५१.८४ टक्‍क्‍यांवर आला आहे. यापैकी ११ मोठ्या प्रकल्पांत ६३.५२ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. मोठ्यापैकी मांजरा आणि सिनाकोळेगाव प्रकल्पात उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. तर, निम्न दुधना प्रकल्पांत केवळ ३ टक्‍के, निम्न तेरणामध्ये १९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत केवळ ३५ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे.

उस्मानाबादमधील  १७ प्रकल्पांत २५ टक्‍के, लातूरमधील ८ प्रकल्पांत १७ टक्‍के, बीडमधील १६ प्रकल्पांत ३८ टक्‍के, जालन्यातील ७ प्रकल्पांत २५ टक्‍के, औरंगाबादमधील १६ प्रकल्पांत ३० टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे. नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांतील ६९ टक्‍के व परभणीच्या २ प्रकल्पातील ६० टक्‍के उपयुक्‍त पाणी काय तो दिलासा देणारा आहे. 

मराठवाड्यात एकूण ७४९ लघू प्रकल्प आहेत. त्यापैकी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी या पाच जिल्ह्यांतील लघू प्रकल्पांमध्ये ३० टक्‍क्‍यांच्या आतच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 

 ७ मध्यम, ८१ लघू प्रकल्प कोरडे

७५ मध्यम प्रकल्पांपैकी ७ प्रकल्प कोरडे आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २, बीडमधील ४, तर लातूर जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. याशिवाय ११ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. यामध्ये औरंगाबाद व उस्मानाबादमधील ३, लातूरमधील २, तर जालन्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. कोरड्या पडलेल्या ८१ लघू प्रकल्पांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २३, जालनामधील १०, बीडमधील २६, लातूरमधील १२, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १० लघू प्रकल्पाचा समावेश आहे.

जोत्याखालील १६३ लघु प्रकल्पांत औरंगाबाद  जिल्ह्यातील ५, जालन्यामधील १६, बीडमधील २८, लातूरमधील ४१, उस्मानाबादमधील ६२, नांदेडमधील ४, परभणीतील, ६ तर हिंगोलीतील एका प्रकल्पाचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com