मराठवाड्यात नव्याने ६८ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर

मराठवाड्यात नव्याने ६८ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर
मराठवाड्यात नव्याने ६८ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर

औरंगाबाद : राज्य शासनाने आधी जाहीर केलेल्या शासन निर्णयात मराठवाड्यातील ४७ तालुक्‍यांत गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता. आता त्यामध्ये नव्याने मराठवाड्यातीलच जालना, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ६८ मंडळांची भर घालण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय ६ नोव्हेंबरला निर्गमीत करण्यात आला आहे.

याआधी ३१ ऑक्‍टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे मराठवाड्यातील ४७ तालुक्‍यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. त्यामध्ये ४४ तालुक्‍यांत गंभीर तर ३ तालुक्‍यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या मराठवाड्यातील तालुक्‍याचा गंभीर व मध्यम दुष्काळी तालुक्‍यात समावेश आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९, बीड जिल्ह्यातील सर्व ११, जालना जिल्ह्यातील ७, नांदेड जिल्ह्यातील ३, उस्मानाबाद जिल्ह्यातील ७, परभणी जिल्ह्यातील ६, हिंगोली जिल्ह्यातील ३ व लातूर जिल्ह्यातील एका तालुक्‍यांचा समावेश आहे.

आता नव्याने ६ नोव्हेंबरला काढलेल्या शासन निर्णयात राज्यातील २६८ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील ६८ मंडळाचा समावेश आहे. या ६८ मंडळांत जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्‍के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची माफी, रोहयोंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी सवलती लागू करण्यासह शासनाने मंजुरी दिली आहे. दुष्काळात समाविष्ट करण्यात आलेल्या मंडळात जालना जिल्ह्यातील २, लातूर जिल्ह्यातील ४२, नांदेड जिल्ह्यातील १४, परभणी जिल्ह्यातील ८ व हिंगोली जिल्ह्यातील २ मंडळांचा समावेश आहे.

दुष्काळ जाहीर झालेली मंडळ जालना जिल्हा : 

  • तालुका मंठा : तळणी, पांगरी.
  • लातूर जिल्हा :   

  • लातूर तालुका : लातूर, बाभळगाव, हरंगूळ, मुरूड, गातेगाव, तांदूळजा, चिंचोली.
  • औसा तालुका : औसा, लामजना, मातोळा, भादा, बेलकुंड, किन्नीथोट, किल्लारी.
  • अहमदपूर तालुका : अहमदपूर, खंडाळी, आंदोरी, शिरूर, हाडोळती.
  • निलंगा तालुका : पानचिंचोली, औराद, अंबूलगा, मदनसुरी, कासारशिरसी
  • उदगीर तालुका : उदगीर, नागलगाव, नळगीर, मोघा, हेर, देवर्जन
  • चाकूर तालुका : चाकूर, नळेगाव, वडवळ, शेळगाव, झरी
  • रेणापूर तालुका : पोहरेगाव, कारेपूर,
  • दावणी तालुका : देवणी,बोरोळ, वलांडी
  • जळकोट तालुका : जळकोट, घोणसी
  • नांदेड जिल्हा

  •  बिलोली तालुका : बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, आदमपूर
  •  लोहा तालुका : लोहा
  •  हदगाव तालुका : मनाठा
  •  किनवट तालुका : इस्लामपूर, जलधरा, शिवणी
  •  धर्माबाद तालुका : करखेली, जारीकोट
  •  नायगाव ख. तालुका : कुंटूर, नरसी, मांजरम
  • परभणी जिल्हा

  • गंगाखेड तालुका : माहातपूरी, माखणी, राणीसावरगाव
  • जिंतूर तालुका : जिंतूर, बोरी, आडगाव, चारठाण
  • पूर्णा तालुका : लिमला.
  • हिंगोली जिल्हा

  • वसमत तालुका : गिरगाव, टेंभूर्णी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com