In Marathwada, the objective of kharif crop loan distribution is not fulfilled
In Marathwada, the objective of kharif crop loan distribution is not fulfilled

मराठावाड्यात खरीप पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती नाहीच

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा वेळेत व उद्दिष्टानुसार शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज पुरवठा झालाच नसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा वेळेत व उद्दिष्टानुसार शेतकऱ्यांना खरिपासाठी पीक कर्ज पुरवठा झालाच नसल्याचे चित्र आहे. आठ जिल्ह्यांपैकी केवळ दोन जिल्ह्यात उद्दिष्टानुसार कर्जपुरवठा झाला आहे. उद्दिष्टाच्या ६८.३५ टक्केच कर्ज पुरवठा विविध बॅंकांनी केला आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी मराठवाड्यात विविध बँकांना ११ हजार ९०४ कोटी ४४ लाख ७ हजार रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३० सप्टेंबर अखेरपर्यंत आठही जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ६८.३५ टक्के अर्थात ८ हजार १३७ कोटी ११ लाख ७७ हजार रुपयांचा कर्जपुरवठा झाला आहे. औरंगाबाद व बीड या दोन जिल्ह्यातच उद्दिष्टानुसार पीक कर्जपुरवठा करण्यात आल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

लातूर व औरंगाबाद या दोन्ही विभागात जिल्हा बँका व ग्रामीण बँकेने उद्दिष्टपूर्ती केली. सर्वाधिक कर्ज पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या व्यापारी बँकांनी मात्र लातूर विभागात केवळ ४० टक्के, तर औरंगाबाद विभागात केवळ ७७ टक्के खरीप पीक कर्जवाटप केले.

माहितीनुसार औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांत खरिपासाठी ५ हजार ४८ कोटी २६ लाख ९० हजार रुपये उद्दिष्ट होते. त्या तुलनेत ३० सप्टेंबरअखेर या चारही जिल्ह्यांत ६ लाख ६२ हजार ६२८ शेतकऱ्यांना ३९११ कोटी ३८ लाख ७० हजार रुपयांचे कर्जवाटप झाले. 

लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड या चार जिल्ह्यांत खरीप पीक कर्जपुरवठ्याचे ६ हजार ८५६ कोटी १७ लाख १७ हजार रुपयांचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ६१ टक्के उद्दिष्टपूर्ती करताना विविध बँकांनी ४ लाख ९७ हजार २८४ हेक्टरसाठी ६ लाख ९० हजार १९८ शेतकऱ्यांना ४२२५ कोटी ७३ लाख ७ हजार रुपये कर्जपुरवठा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

बीड, औरंगाबाद जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती

बीड व औरंगाबाद या दोन जिल्ह्यातच उद्दिष्टाच्या पुढे कर्जपुरवठा झाला. माहितीनुसार बीड जिल्ह्यात ९५० कोटी रुपयांचे कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत १ लाख ६० हजार ५२१ शेतकऱ्यांना १ हजार १५ कोटी १५ लाख ६३ हजार रुपयांचा कर्जपुरवठा झाला.

बँकांनी १०६ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यात ११९६ कोटी  ८० लाख रुपयाचा कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असताना ११३ टक्के कर्जवाटप झाले. विविध बँकांनी २६२४७१ शेतकऱ्यांना १३६० कोटी ३० लाख २० हजार रुपयाचा कर्जपुरवठा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com