मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच पेरणी

मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच पेरणी
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच पेरणी

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती गडद आहे, याची प्रचिती रब्बी पेरणीवरून स्पष्ट झाली आहे. यंदा प्रस्तावित १८ लाख ८६ हजार ५४० हेक्‍टरच्या तुलनेत केवळ ३ लाख ६७ हजार ९२५ हेक्‍टरवर अर्थात १९.५० टक्‍के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत यंदा ७ लाख ७२ हजार ३०९ हेक्‍टरवर रब्बी पेरणी प्रस्तावित होती. त्या तुलनेत १ लाख ०५ हजार १५८ हेक्‍टरवर अर्थात प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत १३. ६२ टक्‍के क्षेत्रावरच रब्बीची पेरणी झाली. दुसरीकडे लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांत यंदा ११ लाख १४ हजार २३१ हेक्‍टर क्षेत्रावर रब्बी पेरणी अपेक्षित असलेल्या क्षेत्राच्या तुलनेत केवळ २ लाख ६२ हजार ७६७ हेक्‍टरवर अर्थात प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत २३.५८ टक्‍के क्षेत्रावरच झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात १२ हजार ४७१ हेक्‍टर, जालन्यात ३३ हजार ३७३ हेक्‍टर, बीडमध्ये ५९ हजार ३१४ हेक्‍टर, लातूरमध्ये ६८ हजार ३२३ हेक्‍टर, उस्मानाबाद जिल्ह्यात ७७ हजार ९०७ हेक्‍टर, नांदेडमध्ये ३० हजार ५८ हेक्‍टर, परभणी जिल्ह्यात ५६ हजार २४३ हेक्‍टर, तर हिंगोली जिल्ह्यात ३० हजार २३६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणी झाली असली तरी उपस्यावर आलेल्या विहिरी, पाण्याची खालावलेली पातळी, उन्हाचा वाढलेला चटका पाहता रब्बीची पिके हाती किती यतील, याची शाश्वती नसल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com