मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटप

मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटप
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटप

औरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना आवश्‍यक तो कर्जपुरवठा करण्यात सर्वच बॅंकांनी हात आखडता घेतल्याची स्थिती आहे. कृषिमंत्र्यांच्या सूचनेनंतरही कर्जपुरवठ्याच्या कार्यात फारशी सुधारणा नाही. मराठवाड्यात उद्दिष्टाच्या केवळ २७ टक्‍केच कर्जपुरवठा करण्यात आला आहे.

यंदाच्या खरिपासाठी आठही जिल्ह्यांत ११३१८ कोटी ६६ लाख ४४ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत मंगळवारपर्यंत (ता.१९) केवळ ५ लाख ५६ हजार ६ शेतकऱ्यांनाच ३१०८ कोटी ३४ लाख ६२ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला. उद्दिष्टाच्या केवळ २७.४६ टक्‍के कर्जपुरवठा करणाऱ्या सहकारी, व्यापारी व ग्रामीण बॅंकांने निराशा केली आहे. दुसरीकडे कर्जमाफीचे कोडे अजूनही न सुटल्याने नव्याने कर्ज मिळण्याबाबत अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.  

खरिपासाठी पेरणीपूर्वीच कर्ज मिळण्याचा प्रश्‍न यंदाही निकाली काढण्यात सरकारला यश आले नाही. जिल्हानिहाय उद्दिष्टाच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात ३७.२२ टक्‍के, जालना २७.५०, परभणीत १४.७६, हिंगोली १०.५७, लातूर ५१.८९, उस्मानाबाद २३.८१ , बीड २४.४०, तर नांदेड जिल्ह्यात केवळ २१.६५ टक्‍के कर्जपुरवठा बॅंकांनी केला आहे. आठ जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांना २०६९ कोटी ७ लाख ६३ हजार रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३ लाख ७८ हजार १८३ शेतकऱ्यांना १३१६ कोटी ५ लाख ३ हजार रुपये कर्जपुरवठा करत ६३.६१ टक्‍के उद्दिष्टपूर्ती या बॅंकांनी केली. 

व्यापारी बॅंकांना सर्वाधिक ७६७२ कोटी ७९ लाख ९८ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट होते. त्यांनी केवळ १७.४९ टक्‍के उद्दिष्टपूर्ती केली. १ लाख २१ हजार ११७ शेतकरी सभासदांना १३४१ कोटी ९० लाख ४० हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला. ग्रामीण बॅंकेला १५७६ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट मिळाले. त्यातुलनेत ग्रामीण बॅंकेने २८.५६ टक्‍के उद्दिष्टपूर्ती करून केवळ ५६ हजार ७०६ शेतकरी सभासदांनाच ४५० कोटी ३९ लाख १९ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

खरीप पीककर्ज मिळालेले शेतकरी

जिल्हा शेतकरी संख्या
औरंगाबाद ६८६८०
जालना ४२६११
परभणी ४२७४१
हिंगोली २७२९०
लातूर  १८९८६२
उस्मानाबाद ७६०८०
बीड ३२५०६
नांदेड ७६२३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com