मराठवाड्यातील मध्यम, लघुप्रकल्पांत २९ टक्केच पाणी

मराठवाड्यातील मध्यम, लघुप्रकल्पांत २९ टक्केच पाणी
मराठवाड्यातील मध्यम, लघुप्रकल्पांत २९ टक्केच पाणी

औरंगाबाद : अर्धेअधिक पावसाळा लोटल्यानंतरही मराठवाड्यातील ८७२ लघू , मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ २९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. त्यातही मोठ्या प्रकल्पात ४१ टक्‍के, लघुप्रकल्पांमध्ये ७.०३ टक्‍के, मध्यम प्रकल्पांत ७.२६ टक्‍के; तर गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमध्ये २२.३९ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये उपयुक्‍त पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याचे चित्र आहे. 

अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश पाणीसाठे कोरडेठाक आहेत. मध्यम ७५ प्रकल्पांपैकी ३१ प्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. त्यामध्ये औरंगाबादमधील ८, जालना १, बीड ९, लातूर २, तर उस्मानाबादमधील तब्बल ११ प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे ७४९ पैकी ३२७ लघुप्रकल्पांत पाणी नाही. कोरड्यांमध्ये औरंगाबादमधील ४२, जालन्यातील ३७, बीड ९५, लातूर ४५; तर उस्मानाबादमधील १०८ लघुप्रकल्पांचा समावेश आहे. ३० मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा अजूनही जोत्याखाली आहे. २७२ लघुप्रकल्पांमधील पाणीसाठ्याचीही हीच अवस्था आहे. 

एकूण ११ मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी, सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, निम्न दुधना, सिनाकोळेगाव या प्रकल्पांमध्ये उपयुक्‍त पाणी नाही. जायकवाडीत ९० टक्‍के, उर्ध्व पेनगंगामध्ये १५‍के, निम्न मनार २४, तर विष्णुपूरीत २२ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. पाणी असलेल्या मध्यम प्रकल्पांत ७.२६ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. दुसरीकडे लघुप्रकल्पांमध्येही केवळ ७.०३ टक्‍के; तर गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांत २२.३९ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातर्फे देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत ९ टक्‍के, जालन्यातील ७ प्रकल्पांत २१ टक्‍के, बीडमधील १६ मध्यम प्रकल्पात एक टक्‍का, उस्मानाबादमधील १७ मध्यम प्रकल्पांत १, तर नांदेड ९ प्रकल्पांत २३ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघुप्रकल्पांत १४ टक्‍के, जालनामधील ५७ प्रकल्पांत १ टक्‍का, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ३३‍, बीडमधील १२६ प्रकल्पांत १, हिंगोलीतील २६ प्रकल्पांत ३२, लातूरमधील १३२ प्रकल्पांत १, परभणीतील २२ प्रकल्पांत ५, तर उस्मनाबादमधील २०५ लघुप्रकल्पांत केवळ १ टक्‍काच उपयुक्‍त पाणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com