मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच वाटप

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जपुरवठा करण्यात बॅंकांची कासवगती कायम आहे. मिळालेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत १० ऑगस्टपर्यंत केवळ ४०.८३ टक्केच कर्ज पुरवठा झाला आहे.
In Marathwada, only 40.83 per cent of crop loans were distributed
In Marathwada, only 40.83 per cent of crop loans were distributed

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जपुरवठा करण्यात बॅंकांची कासवगती कायम आहे. मिळालेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत १० ऑगस्टपर्यंत केवळ ४०.८३ टक्केच कर्ज पुरवठा झाला आहे.

आठही जिल्‍ह्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी ११ हजार ९०४ कोटी ४४ लाख ७ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले होते. त्यापैकी सर्व बँकांनी मिळून ८ लाख ८२ हजार ११३ शेतकऱ्यांना ४ हजार ८६० कोटी २७ लाख ११ हजार रुपये कर्ज पुरवठा केला. या कर्ज पुरवठ्यात मिळालेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत सर्वाधिक ८८ टक्के कर्ज पुरवठा जिल्हा बँकांनी केला. 

जिल्हा बँकांना २१०१ कोटी ६५ लाख ६८ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट होते. त्या तुलनेत ५ लाख ३२ हजार ७८ शेतकऱ्यांना जिल्हा बँकांनी १८५४ कोटी ६७ लाख ३४ हजार रुपयांचा कर्जपुरवठा केला. ग्रामीण बँकेला १६३६ कोटी ७२ लाख ७४ हजार रुपये कर्जपुरवठ्याची उद्दिष्ट होते. त्यातून १ लाख ४८ हजार ३२३ शेतकऱ्यांना १०६७ कोटी १५ लाख ९८ हजार रुपये कर्ज पुरवठा करूनत ६५ टक्के उद्दिष्टपूर्ती केली.  शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्‍न कायम

आठही जिल्ह्यातील व्यापारी बँकांना सर्वाधिक ८ हजार १६६ कोटी पाच लाख ६५ हजार रुपये कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या तुलनेत व्यापारी बँकांनी केवळ २३.७४ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. तर, २ लाख १ हजार ७१२ शेतकऱ्यांना १९३८ कोटी ४३ लाख ७९ हजार रुपये कर्जवाटप केले.

शासन स्तरावरून आढाव्यांचा सपाटा व सूचनांचा फैरी झाडल्या जात आहेत. परंतु, खरिपाची पीक काढण्याची वेळ आली तरी शेतकऱ्यांना उद्दिष्टानुसार वेळेत कर्ज पुरवठा झाला नसल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न कायम असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com