agriculture news in marathi, Marathwada in rain | Agrowon

मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊस
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत सर्वदूर हलक्‍या, मध्यम ते दमदार पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. या दोन्ही जिल्ह्यांतील १३ मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गुरुवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत सर्वदूर हलक्‍या, मध्यम ते दमदार पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. या दोन्ही जिल्ह्यांतील १३ मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.

उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगरूळ मंडळात सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी रात्री सुरू झालेल्या या पावसाचा जोर गुरुवारी पहाटेपासून बहुतांश भागात वाढला होता. दुपारी दोन वाजेपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता.
जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा, परभणी जिल्ह्यातील पालम वगळता सर्व तालुक्‍यांत, हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, नायगाव वगळता उर्वरित चौदा तालुक्‍यांत, बीड जिल्ह्यातील आष्टी शिरूर, कासार वगळता सर्वदूर, लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्‍यातील काही भाग वगळता उर्वरित सर्व तालुक्‍यांत सर्वदूर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार ते जोरदार हजेरी राहिली.

जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर उस्मानाबाद या सात जिल्ह्यांतील २२ तालुक्‍यांत सरासरी ३० ते ८९ मिलिमीटरदरम्यान पावसाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्‍यात सरासरी ५३.२५ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्‍यात सरासरी ५०. २५ मिलिमीटर, किनवट तालुक्‍यात ५०.७१ मिलिमीटर, माहूर तालुक्‍यात ६२ मिलिमीटर, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍यात ५६ मिलिमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्‍यात ८९.४३ मिलिमीटर, लोहारा तालुक्‍यात सरासरी ५५.६७ मिलिमीटर, पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद झालेल्या मंगरूळ मंडळापाठोपाठ इटकळ मंडळात १२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तेरा मंडळांत ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस
मराठवाड्यातील तेरा मंडळात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सात मंडळांचा समावेश आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांनंतरही मराठवाड्यातील बहुतांश भागात दुपारी दोन वाजेपर्यंत पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात कायम होता.

 

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...