मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेना

औरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार पाऊस सुरू आहे. काही दिवसांपून हा पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेना गेल्याचे चित्र आहे.
  In Marathwada, rains did not leave behind kharif crops
In Marathwada, rains did not leave behind kharif crops

औरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार पाऊस सुरू आहे. काही दिवसांपून हा पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेना गेल्याचे चित्र आहे.

जालना, बीडमधील काही मंडळात पावसांचा जोर राहिला. तर, उस्मानाबाद, लातूरमधील बहुतांश मंडळांत पावसाने उसंत घेतल्याचे चित्र बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंत पाहायला मिळाले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील ५८ मंडळांत पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील निल्लोड मंडळात ६८, तर सोयगाव मंडळात ७४ मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील ३४ मंडळांत, उस्मानाबादमधील २२, लातूरमधील ३६, तर जालन्यातील ४० मंडळांत हलका ते दमदार पाऊस झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील मोहा मंडळात २० मिलिमीटर, लोहारा १५.८, माकणी १५.८, जेवळी १५.८, तर मंगरूळ मंडळांत ३८ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. बीड जिल्ह्यातील सिरसदेवी मंडळात ३३.८, अंबाजोगाई १७, लोखंडी सावरगाव २२.३, होळ १५.३, बनसारोळा ३७.८, तर नांदुर घाट मंडळात ३९.८ मिलिमीटर पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील भोकरदन मंडळात ३८.३, सिपोरा २६.३, धावडा २६.३, पिंपळगाव ५७, हसनाबाद २६.३, केदारखेडा २६.३, जाफराबाद ३१.३, तर दाभाडी मंडळात ४३.५ मिलिमीटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील नालेगाव मंडळात १५.८, घोणसी मंडळात १४, आस्था १२.३, तर नळगीर मंडळात २०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, बुधवारी दुपारनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील काही मंडळांत पावसाने जोरदार हजेरी लावली. 

पिकांचे नुकसान, हंगाम लांबणीवर

मराठवाड्यातील बहुतांश मंडळांत पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान केले आहे. सततच्या पावसाने कापूस, मका, बाजरी, सोयाबीन, उडीद आदी पिकांचे हंगाम लांबणीवर पडले आहेत. अनेक ठिकाणी पिकांना मोड फुटत आहेत. शेत शिवारात साचलेले पाणी पावसाची उसंत मिळताच काढण्यात शेतकरी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com