agriculture news in marathi, Marathwada severe water scarcity | Agrowon

मराठवाडा भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : दुष्काळाची छाया गडद झालेल्या मराठवाड्यात पाणीटंचाईही हातपाय पसरायला लागली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत चार जिल्ह्यांतील टंचाईची झळ बसणाऱ्या लोकसंख्येत २५ हजारांची भर पडली आहे. १८९ गाव, वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने २११ टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची सोय करण्यात आली आहे.

औरंगाबाद : दुष्काळाची छाया गडद झालेल्या मराठवाड्यात पाणीटंचाईही हातपाय पसरायला लागली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत चार जिल्ह्यांतील टंचाईची झळ बसणाऱ्या लोकसंख्येत २५ हजारांची भर पडली आहे. १८९ गाव, वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने २११ टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची सोय करण्यात आली आहे.

गत आठवड्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड आदी जिल्ह्यांतील १७५ गाव व ३ वाड्यांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत होती. ती संख्या आता १८६ गाव व ३ वाड्यांपर्यंत जाऊन पोचली आहे. टंचाईची ही स्थिती हळूहळू भीषणतेकडे वाटचाल करीत असून, बहुतांश भागात ऑक्‍टोबरमध्येच विहिरींनी तळ गाठला आहे. डिसेंबरनंतर मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट भीषण होण्याचे संकेत देत आहेत.

सध्या औरंगाबाद, जालना, बीड व नांदेड जिल्ह्यातील १८९ गाव, वाड्यांमधील ४ लाख ५२ हजार २९३ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. गत आठवड्यात ही संख्या जवळपास ४ लाख २५ हजार होती. पाणीपुरवठ्यासाठी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड या पाचही जिल्ह्यांत २२० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पावसातील प्रदीर्घ खंड व रुसलेल्या परतीच्या पावसाने पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील फुलंब्री, पैठण, गंगापूर, वैजापूर, सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद, परतूर आदी तालुक्‍यांतील आणि भोकरदन शहर मिळून १८६ गावे व ३ वाड्यांत पाणीटंचाई आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, परतूर, नांदेडमधील मुखेड, बीडमधील परळी वैजनाथ आदी ठिकाणीही पाणीटंचाईने डोके वर काढले आहे.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे, वाड्यांच्या संख्येत २४ सप्टेंबरअखेर २२ ची भर पडली. ही संख्या १६४ गाव-वाड्यांवर पोचली होती. टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची संख्या वाढल्याने गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या १५५ टॅंकरची संख्याही २१ ने वाढून १७६ वर पोचली होती.

१५ आॅक्टोबरअखेरची जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा     गाव-वाड्या  टॅंकर
औरंगाबाद १६३  १७१
जालना २३     ३७
नांदेड  २  
बीड 

 

विहिरींचे जिल्हानिहाय अधिग्रहण

औरंगाबाद  १०१
जालना   ५४
नांदेड ०२
बीड  २५
उस्मानाबाद  ३८

 

 

इतर बातम्या
देशात सोयाबीन लागवडीत ११ टक्के घटनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
भारताची चंद्राला पुन्हा गवसणी;...श्रीहरिकोटा : चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
वणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...
दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड :  नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...
वाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...
रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...
साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...