agriculture news in marathi Marathwada silk farming Focus point: Dr. Dhawan | Page 2 ||| Agrowon

मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ः डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

जालना : ‘‘मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ठरला आहे. रेशीम शेती महाविद्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. हे महाविद्यालय जालन्यात व्हावे’’, अशी अपेक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केली.

जालना : ‘‘हवामान बदलानुसार योग्य त्या पिकांच्या लागवडीमध्ये रेशीम शेती, बांबू शेतीसारख्या पिकांच्या लागवडीवर भर दिला जात आहे. नवीन आव्हानांचा वेध घेऊन शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ व यंत्रणा काम करत असते. या बदलात मराठवाडा  रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ठरला आहे. रेशीम शेती महाविद्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. हे महाविद्यालय जालन्यात व्हावे’’, अशी अपेक्षा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केली. 

मराठवाडा शेती साहित्य मंडळांतर्गत खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे शुक्रवारी (ता.२६) ऑनलाइन कृषी तंत्रज्ञान महोत्सवाला सुरुवात झाली. उदघाटक म्हणून कुलगुरू डॉ. ढवण बोलत होते. २८ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालेल. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय बोराडे म्हणाले,  ‘‘शाश्वत शेतीची गरज आता वाढत जाईल. त्याप्रमाणे रेशीम , बांबू आणि सुगंधी वनस्पतींची लागवड केली आहे. जोड धंदा म्हणून कोंबडी पालन, शेळी पालनासारख्या गोष्टीची गरज भविष्यात शेतकऱ्यांना पडेल.’’ 

अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग म्हणाले, ‘‘उत्पादनवाढीसाठी केव्हीके मोलाचे काम करते. दुष्काळावर मात करण्यासाठी नियमित प्रयत्न असतो. रेशीम शेतीमध्येही मोठे योगदान दिले. मूल्यवर्धनावर केंद्राने जास्त भर द्यावा.’’ 

विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव म्हणाले, ‘‘केव्हीके, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग यांच्या मदतीनेच अन्नधान्यांचे विक्रमी उत्पादन आले. शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविणे आवश्यक आहे.’’ 

आज घडणार ऑनलाइन प्रक्षेत्र भेट 

या महोत्सवात आज स्लाइडशोच्या माध्यमातून ऑनलाइन प्रक्षेत्र भेट घडवून आणली जाणार आहे. यामध्ये पीक प्रात्यक्षिके, फळबाग, भाजीपाला, बांबू प्रजाती, सुगंधी वनस्पती यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. उद्या (ता.२८) देखील विविध विषयांवर मार्गदर्शन होईल. त्यानंतर महोत्सवाचा समारोप होईल. 
 


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...