येलदरी धरणाच्या दहा दरवातून वेगाने विसर्ग

सोमवारी (ता. १७) रात्री नऊच्या सुमारास येलदरी धरणाच्या दहा दरवाजे दीड मीटरने उघडून नदीपात्रात ६०९०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला.त्यामुळे धरणाजवळील येलदरी ते सेनगाव राज्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने मराठवाडा- विदर्भाचा या मार्गाने होणारा संपर्क तुटला होता.
Marathwada-Vidarbha connection was lost
Marathwada-Vidarbha connection was lost

परभणी ः उर्ध्व भागातील बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील विसर्गामुळे येलदरी धरणामधील पाण्याच्या आवकेत मोठी वाढ झाल्यामुळे सोमवारी (ता. १७) रात्री नऊच्या सुमारास येलदरी धरणाच्या दहा दरवाजे दीड मीटरने उघडून नदीपात्रात ६०९०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला.त्यामुळे धरणाजवळील येलदरी ते सेनगाव राज्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने मराठवाडा- विदर्भाचा या मार्गाने होणारा संपर्क तुटला होता.

येलदरी  आणि सिद्धेश्वर धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्यामुळे पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे. पुराचे पाणी शेतात शिरल्याने जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.येलदरी धरणातून विसर्गात वाढ करण्यात आल्यामुळे मंगळवारी (ता. १८) सकाळी या धरणामध्ये ७९७.००४ एमएमक्युब (९८.४२) टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

धरणातून गेल्या २४ तासांत धरणात ११८.०८३ एमएमक्युब पाण्याची आवक (यंदाची एकूण आवक ५३६.१०१ एमएमक्युब) झाली तर ९९.९९८ एमएमक्युब तर आजवर एकूण १४९.९८१ एमएमक्युब एवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. विसर्गात वाढ करण्यात आल्यामुळे धरणाजवळील येलदरी ते सेनगाव राज्य रस्त्यावरील पूल मंगळवारी (ता. १८) दुपार पर्यंत पाण्याखाली गेला होता.

त्यामुळे या मार्गे होणारा मराठवाडा -विदर्भाचा तसेच परभणी हिंगोली जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला होता. दोनही धरणांतून विसर्ग सुरू असलेल्यामुळे पूर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने जमिनी खरडून गेल्या, पिके आडवी झाली. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे  नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com