मराठवाड्यात पाणीसाठे तळाला

मराठवाड्यात पाणीसाठे तळाला
मराठवाड्यात पाणीसाठे तळाला

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील सर्वच पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे. ३८७ लघु-मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. ३३१ लघु-मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. ८७२ मोठ्या, लघू, मध्यम प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये केवळ १.७२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत केवळ १.९४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्‍वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, विष्णुपुरी, निम्न दुधना, सीनाकोळेगाव आदी मोठ्या प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. केवळ निम्न मनार प्रकल्पात ११ टक्‍के, तर ऊर्ध्व पेनगंगात क्षमतेच्या केवळ २ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील १६, जालना ७, परभणीतील २ अशा २५ मध्यम प्रकल्पात उपयुक्‍त पाणी नाही. बीडमधील १६, लातूरमधील ८, उस्मानाबादमधील १७ मध्यम प्रकल्पांत प्रत्येकी केवळ १ टक्‍काच उपयुक्‍त पाणीसाठा आहे. याशिवाय नांदेडमधील आठ मध्यम प्रकल्पांत केवळ ४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. 

मराठवाड्यातील  ७४९ लघुप्रकल्पांची अवस्थाही अशीच आहे. जालना जिल्ह्यातील ५७, लातूरमधील १३२ लघुप्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याची वाणवा आहे. औरंगाबादेतील ९३ लघुप्रकल्पांत २ टक्‍के, बीडमधील १२६, परभणीतील २२ व हिंगोलीतील २६ लघुप्रकल्पांमध्ये केवळ १ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे. उस्मनाबाद जिल्ह्यातील २०५ लघुप्रकल्पात २, तर नांदेडमधील ८८ लघुप्रकल्पात केवळ ५ टक्‍केच उपयुक्‍त पाणी आहे.तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधारे कोरडे आहेत. गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यात केवळ ०.१९ टक्‍के उपयुक्‍त पाणी आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

पाण्याअभावी होरपळ कमालीची त्रासदायक ठरत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात रस्त्याच्या कामावर पाणी मारणाऱ्या टॅंकरचे पाणी पळत जाऊन भरण्याची वेळ लोकांवर आली आहे. संकटाची तीव्रता अधिकच वाढली आहे. 

कोरडे, जोत्याखालील पाण्याचे मध्यम प्रकल्प

जिल्हा कोरडे जोत्याखाली
औरंगाबाद १२
जालना ३ 
बीड १०
लातूर 
उस्मानाबाद
नांदेड
परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com