मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे  स्वप्न पूर्ण करू ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परळी, जि. बीड  : भाजपचे राज्यातील आजचे यश आहे त्यामागे गोपीनाथरावांचे परिश्रम आहेत. त्यांनी आमच्यासारखे नेते घडवले त्यांची स्वप्नं पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे ती आम्ही नक्की पूर्ण करू. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न गोपीनाथरावांनी पाहिले होते, आम्ही नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ते पूर्ण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

ज्येष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतीदिनी सोमवारी (ता. ३) गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. या वेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाचे आणि त्यांच्या कामाचेही कौतुक केले. या वेळी धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत, त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, की जे गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व मानतात व त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करतात त्यांनाच गोपीनाथरांवाचे नाव घ्यायचा अधिकार आहे. पंकजा ताई व प्रीतम तसेच मी भाजपचे आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांचे मानसपुत्र आहोत. आम्हाला त्यांचे नाव घ्यायचा अधिकार आहे. गोपीनाथरावांचे नाव घ्यायचा अधिकार कुणाला आहे याचा निर्णय आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी दिला आहे. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. 

मराठवाड्यातून आठच्या आठ खासदार आणण्याचे गोपीनाथरावांचे स्वप्न होते, आम्ही या वेळी फक्त एक जागा ४ हजारांच्या फरकाने गमावली. ही जागाही आम्ही पुढीलवेळी जिंकू आणि गोपीनाथरावांचे या वेळी राहिलेले स्वप्न पूर्ण करू. मराठवाडा दुष्काळमुक्त करायचे गोपीनाथरावांचे स्वप्न होते ते आम्ही मराठवाड्यात वॉटरग्रीड तयार करून प्रत्यक्षात आणू. त्यासाठीची योजना आखली आहे, तिचे काम लवकरच सुरू होईल असे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचेही आवर्जून कौतुक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com