‘मराठवाडी’तील पाण्याची काठावरील घरांकडे कूच

‘मराठवाडी’तील पाण्याची काठावरील घरांकडे कूच
‘मराठवाडी’तील पाण्याची काठावरील घरांकडे कूच

ढेबेवाडी, जि. सातारा ः मराठवाडी धरणातील पाण्यात उमरकांचन येथील विहिरीसह तेथील स्मशानशेड गेल्याने धरणाच्या काठावरील अनेक घरांत स्थलांतराच्या हालचाली सुरू होत्या. पाण्यात बुडल्याने दगडमातीच्या जीर्ण घरांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार असल्याने त्याच्याशी जोडलेले पिढ्यान्‌पिढ्यांचे नाते तोडताना धरणग्रस्तांची पाऊले अडखळताना दिसत आहेत. 

दरम्यान धरणग्रस्तानच्या निवाऱ्यासाठी उभारलेल्या अनेक शेड दलदलीच्या फेऱ्यात अडकली असून धरणग्रस्त प्रापंचिक साहित्यासह तेथे स्थलांतरित होऊनही अजूनही काही शेडमध्ये काँक्रीट न केल्याने चिखलाचे साम्राज्य दिसून येत आहे.

सांडव्याचे बांधकाम केल्यामुळे मराठवाडी धरणात यावर्षी प्रथमच जवळपास दुपटीने पाणीसाठा होणार असल्याने निर्माण होणारी पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र, नियोजनातील अनेक बाबतीतील त्यांच्या अक्षम्य दिरंगाईमुळे बिकट प्रश्न निर्माण होण्याचीही चिन्हे आहेत. 

यावर्षी धरणाची पाणीपातळी ६४३ ते ६४६ मिटरपर्यंत पोचणार असल्याने २६ कुटुंबाच्या स्थलांतराची तयारी पाटबंधारे विभागाने केली असली तरी त्यासाठी अजूनही शेडची उभारणी सुरूच आहे. काही ठिकाणची शेड धोकादायकस्थितीत डोंगर पायथ्याला उभारली असून अतिपावसाने त्या परिसरात सर्वत्र दलदलीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. 

धरणग्रस्त प्रापंचिक साहित्य घेऊन शेडात येऊन सुद्धाही काही शेडात जमिनीवर काँक्रीट न केल्याने तिथे चिखलच झाला आहे. पाणीसाठा वाढणार हे निश्चित असताना पाटबंधारे विभागाने अगोदरच ही तजवीज करायला हवी होती परंतु तसे झालेले दिसत नाही. पाटबंधारे विभागाचे अधिकारी सगळं व्यवस्थित होईल, असे धरणग्रस्तांना सांगत असले तरी वास्तवता कुठे तरी घोडं पेंड खातय अशीच आहे. चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे.

पिढ्यान्‌पिढ्याचा संसार मोडून शेडात जायला जीव धजवना झालाय, पन धरणाचं पानी घराला गाठाय आल्यानं दुसरा इलाजबी राह्यल्याला न्हाय. अगुदरच पडाय झाल्याल घर पाण्यात उभं राह्यलं ह्याची शाश्वती न्हाय वाटत. - राधाबाई मोहिते, धरणग्रस्त उमरकांचन खालचे आवाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com