agriculture news in marathi March month delivered all season weather | Agrowon

मार्च महिन्यात गडबडले हवामान; थंडी, वादळ, पाऊस, गारपीट अन् उन्हाळाही !

संदीप नवले
सोमवार, 5 एप्रिल 2021

रात्री थंडी, तर दिवसा उन्हाचा चटका, पूर्वमोसमी पावसाची जोरदार हजेरी, गारा, तापमानात पुन्हा झालेली घट, शेवटच्या आठवड्यात कमाल तापमानात झालेली वाढ, असे बदल हे मार्च महिनाभरातील हवामानाचे वैशिष्ट्ये ठरले आहे.

पुणे : राज्यात दिवस रात्रीच्या तापमानातील तफावत वाढल्याने रात्री थंडी, तर दिवसा उन्हाचा चटका  अशा प्रारंभीच्या वातावरणातच दुसऱ्या पंधरवड्यात ढगाळ हवामानासह पूर्वमोसमी पावसाने लावलेली जोरदार हजेरी, काही ठिकाणी गारांचा पाऊस, अन् तापमानात झालेली घट, काहीसा थंड दिवस, यानंतर शेवटच्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेचे संकेत देत कमाल तापमानात झालेली वाढ, असे बदल हे मार्च महिनाभरातील हवामानाचे वैशिष्ट्ये ठरले आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे २९ मार्चला देशातील उच्चांकी ४३.३ अंश सेल्सिअसची सर्वाधिक नोंद झाल्याने देशासह जगभरात दखलपात्र ठरली. 

दिवस रात्रीच्या तापमानात तफावत
राज्यात दिवसाच्या तापमानात वाढ होत असताना ढगाळ वातावरण आणि वेगवान वाऱ्यामुळे रात्रीच्या तापमानात घट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे तापमानातील तफावत वाढली होती. बऱ्यांच ठिकाणी ही तफावत १२ ते २० अंशांपर्यंत होती. रात्रीच्या वेळी थंडी तर दिवसा उन्हाचा चटका असे परस्पर विरोधी हवामान अनुभवायला मिळाले. तापमानातील ही तफावत महिन्यातील अनेक दिवस कायम होती.

 अवकाळी पावसाचा दणका 
राज्यात ९ ते १६ मार्च आणि १८ ते २४ मार्च या कालावधीत अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन ढगाळ वातावरण तयार झाले होते. यामुळे ९ ते १६ या काळात पाऊस पडला नसला, तरी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाल्याचे पाहायला मिळाले. तर १८ ते २४ या कालावधीत अवकाळी पावसाने अक्षरश धुमाकूळ घातला होता. राज्यात १ ते २४ मार्च या कालावधीत पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, बीड, धुळे, जळगाव, बुलडाणा, परभणी, नांदेड, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, पालघर, रायगड या जिल्ह्यांत अतिवृष्टीसदृश पाऊस झाला होता. तर भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला. अमरावती, सातारा जिल्ह्यांत सर्वसाधारण पाऊस झाला. तर नंदुरबार, जालना, अकोला या जिल्ह्यांत कमी, तर औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, सांगली, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस पडला होता. या पावसाने पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गारपीठ, विजाच्या कडकडाट झाल्याने वित्तहानीसह काही प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या.  

 उन्हाचा चटका
मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाचा चटका वाढण्यास सुरुवात झाल्याने ७ आणि ८ मार्चला पारा चाळिशीपार गेला होता. त्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन कमाल तापमानाचा पारा चांगलाच घसरला. राज्यात ९ ते १६ मार्च या कालावधीत पारा हा ४० अंश सेल्सिअसच्या खालीच होता. तर १७ मार्च रोजी पुन्हा ढगाळ वातावरणाची स्थिती झाल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाल्याने पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला. तर १९ ते २४ मार्च या कालावधीत पारा पुन्हा कमी झाला होता. तर २५ मार्चपासून उन्हाचा पारा हळूहळू वाढत जाऊन मार्चच्या अखेरीस ४३ अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली होती.  

फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीपासून राज्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे सरकत होता. दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात ढगाळ हवामानामुळे तापमानात काही अंशी घट झाली. तिसऱ्या आठवड्यात वातावरणात वेगाने बदल होऊन मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होऊन पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. त्यानंतर पाऊस झाल्याने दिवसही काही प्रमाणात थंड अनुभवायला येत होता. या काळात किमान तापमान खाली उतरत असताना २८ मार्च रोजी बुलडाणा येथे १४.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमान नोंदविले गेले होते.  

उष्णतेची लाट :  
मार्चच्या अखेरच्या दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले होते. त्यामुळे उष्णतेत वेगाने वाढ झाली होती. राज्यात २९ मार्चपासून उन्हाच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली. तर २८ ते ३१ मार्च या कालावधीत विदर्भातील अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, यवतमाळ या भागांत काही प्रमाणात उष्णतेची लाट आली होती. त्यामुळे २९ मार्च रोजी ब्रह्मपुरी येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर ३० व ३१ मार्च रोजी चंद्रपूर येथे ४३.६ अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदविले गेले होते.  

मार्च महिन्यातील विविध शहरांतील उच्चांकी तापमान अंश सेल्सिअसमध्ये, कंसात तारीख  :

 • शहर  ---- कमाल तापमान
 • चंद्रपूर            ४३.६ (३०, ३१)
 • जळगाव         ४१.५ (२९)  
 • मालेगाव         ४२.० (२९)  
 • सोलापूर         ४१.५ (२९)    
 • परभणी           ४१.१ (२९)  
 • अकोला          ४२.८ (२९)  
 • अमरावती       ४१.८ (२९)  
 • बुलडाणा         ४० (२९)  
 • ब्रह्मपुरी          ४३.३ (२९)  
 • चंद्रपूर            ४२.८  (२९)  
 • गोंदिया           ४०.८ (२९)  
 • नागपूर           ४१.५ (२९)  
 • वर्धा               ४२ (२९)
 • जळगाव          ४१.४ (२८)
 • मालेगाव          ४१.८ (२८)
 • अकोला           ४१.५ (२८)
 • अमरावती        ४०.२(२८)
 • ब्रम्हपुरी           ४१.८ (२८)
 • चंद्रपूर            ४२.४ (२८)
 • नागपूर            ४०.२ (२८)
 • वर्धा                ४०.६ (२८)
 • मुंबई (सांताक्रूझ) ४०.९ (२७)
 • जळगाव         ४०.४ (२७)
 • सोलापूर         ४०.२ (२७)  
 • अकोला          ४०.४ (२७)
 • चंद्रपूर            ४१.२ (२७)
 • रत्नागिरी         ४० (२६)
 • सोलापूर         ४०.३ (२६)  
 • चंद्रपूर            ४०.२ (२६)
 • चंद्रपूर            ४०.६  (२५)
 • रत्नागिरी         ३९ (२४)  
 • अकोला          ४०.३ (१७)
 • ब्रम्हपुरी          ४०.१ (१७)
 • ब्रह्मपुरी          ३९.९ (१५)
 • चंद्रपूर            ३९.४ (१४)
 • यवतमाळ       ३९.५ (११)
 • ब्रह्मपुरी          ४०.१ (८)
 • ब्रम्हपुरी          ४०.६ (७)
 • ब्रह्मपुरी          ३९.८ (४)
 • अकोला          ३९.५ (२)
 • चंद्रपूर            ३९.९ (१)

इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...