पुणे बाजार समितीत झेंडूची ३४२ टन आवक

पुणे बाजारसमितीत झालेली झेंडू फुलांची आवक
पुणे बाजारसमितीत झालेली झेंडू फुलांची आवक

पुणे  ः विजयादशमीसाठी (दसरा) विशेष मागणी असलेल्या झेंडू फुलांची पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. ७) सुमारे ३४२ टन एवढी उच्चांकी आवक झाली होती. या वेळी सुमारे १० ते ४० रुपये, तर सरासरी २५ रुपये प्रतिकिलो असे दर झेंडू फुलांना मिळाले. पांढऱ्या आणि पिवळ्या शेवंतीची सुमारे ३० टन आवक झाली होती. या वेळी शेवंतीला ५० ते १८० रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याची माहिती फूल विभागप्रमुख प्रदीप काळे यांनी दिली. 

विजयादशमीला झेंडू फुलांना विशेष मागणी असते. या निमित्ताने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन दिवस अगोदरपासून फुलांच्या आवकेला प्रारंभ झाला. रविवारी (ता. ६) झेंडूची सुमारे ११० टन आवक झाली होती. राज्याच्या विविध जिल्‍ह्यांमधून ही आवक होती. अतिवृष्टीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रात फुलांचे मोठे नुकसान झाले होते. दुष्काळग्रस्त भागात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी झेंडूचे उत्पादन घेतले होते. यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. शेवंतीचे पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने चांगल्या दर्जाच्या पांढऱ्या शेवंतीला ८० ते १८० तर पिवळ्या शेवंतीला ५० ते १५० रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याचे श्री. काळे यांनी सांगितले.  

याबाबत सातारा जिल्‍ह्यातील काटेवाडी बुध (ता. खटाव) येथील शेतकरी किरण कोरडे म्हणाले, की मी दसरा आणि दिवाळीचे नियोजन करून, दरवर्षी दीड एकरावर झेंडूची लागवड करतो. दसऱ्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून फुले विक्रीसाठी आणत आहे. तीन दिवसांत सुमारे ८ टन फुलांची विक्री केली. एका किलोला २५ ते २५ रुपये दर मिळाला. मात्र, हा दर ५० रुपयांपर्यंत मिळणे अपेक्षित होते. मात्र दिवाळीत हाच दर मिळेल अशी अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com