हिवतडच्या माळावरील झेंडू कोमेजले; नऊ कोटींचा फटका 

आटपाडी, जि. सांगली ः टेंभूच्या पाण्याच्या कृपेने अल्पावधीत झेंडू फुलांचे हब बनलेल्या हिवतडच्या माळावर फुललेला झेंडू ‘कोरोना’च्या साथीमुळे कोमेजून गेला आहे. बाजारपेठच बंद असल्याने शेतकऱ्यांनी झेंडूवर नांगर चालवला आहे. झेंडूपासून दरवर्षी मिळणारे सात ते नऊ कोटींचा फटका बसला आहे.
Marigold Dried on Hetwad wreath; Nine crore lost
Marigold Dried on Hetwad wreath; Nine crore lost

आटपाडी, जि. सांगली ः टेंभूच्या पाण्याच्या कृपेने अल्पावधीत झेंडू फुलांचे हब बनलेल्या हिवतडच्या माळावर फुललेला झेंडू ‘कोरोना’च्या साथीमुळे कोमेजून गेला आहे. बाजारपेठच बंद असल्याने शेतकऱ्यांनी झेंडूवर नांगर चालवला आहे. झेंडूपासून दरवर्षी मिळणारे सात ते नऊ कोटींचा फटका बसला आहे. 

टेंभू योजनेचा मुख्य कालवा गावच्या माथ्यावरुन जातो. या पाण्याचा सर्वाधिक लाभ हिवतडला झाला आहे. पाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी विविध पिके घेतली. यात झेंडूचे चांगले उत्पन्न मिळण्याचा हातखंडा अनेकांनी मिळवला. आणि सारे गाव झेंडूच्या मागे लागले. नंतर काळेवाडी, गोमेवाडी, करगणी, मानेवाडी, नेलकरंजी या भागातही झेंडूची लागवड होत गेली. २५ जानेवारी ते २५ एप्रिल दरम्यान बहुतांश शेतकरी झेंडूची मशागत करून ,खते घालून बेडवर लागवड करतात. हिवतडमध्ये चारशे एकर तर परिसरातील सर्व गावासह सहाशे एकर क्षेत्रावर झेंडू लावला जातो. 

झेंडूची फुले मुंबईत दादरला मीनाताई ठाकरे फुल मार्केटला दररोज दोन ते चार आयशर गाड्या पेट्या भरून पाठवल्या जातात. संपूर्ण हंगामात झेंडूला सरासरी ६० ते १०० रुपया दरम्यान किलोला दर मिळतो. यासाठी एकरी साठ हजार रुपयादरम्यान खर्च येतो. खर्च वजा जाता एक ते दीड लाख रुपये पदरात पडतात. संपूर्ण हंगामात झेंडू पासून सात ते नऊ कोटी रुपये दरवर्षी तालुक्‍यात येतात. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही झेंडूची लागवड केली. हिवतडचे माळरान फुलाने फुलले. पण ‘कोरोना’ साथीमुळे बाजारपेठा बंद. याचा मोठा फटका झेंडूला बसला. एकही फुल विक्रीसाठी गेले नाही. पहिल्या टप्प्यात लागवड केलेल्या झेंडूवर शेतकऱ्यांनी अक्षरशः नांगर फिरवला आहे. दुसऱ्या टप्प्यात लागवड केलेल्या झेंडूची कळी तोडली जात आहे. तिसऱ्या टप्प्यातील लागवड अपवाद वगळता ठप्प झाली आहे. एप्रिल पासून विवाह सोहळ्याची सुरूवात होते. यासह विविध कार्यक्रमांना झेंडूची मोठी मागणी असते. मात्र, ‘कोरोना’मुळे सोहळे आणि उत्सव बंद झाले. त्यामुळे झेंडूची मागणी बंद झाली आहे. 

दोन एकर झेंडू लावला पण ‘कोरोना’मुळे मार्केट बंद पडले. त्यामुळे कसलाही झेंडू पाठवला नाही. शेवटी झेंडूचे शेत नांगरले. झेंडू पासून गावाला मिळणारे सात ते नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.  - प्रमोद धायगुडे, शेतकरी, हिवतड 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com