नाशिक जिल्ह्यात पावसाने झेंडू फुलांचे नुकसान

झेंडू फुलांची तोडणी सुरू केली आहे. मात्र फुले खराब झाल्याने व्यापारी माल घेत नाहीत. व्यापाऱ्यांकडून फुले कोरडी करण्याची मागणी आहे. त्यानुसार फुले वळविण्यात येत आहेत. पाऊस थांबल्यानंतर फुलातील पाणी सुकण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात. मात्र दिवाळी तोंडावर आल्याने आर्थिक गणित बिघडणार आहे. हजारो रुपयांचा खर्च वाया गेला असून, पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. - सूरज सहाणे,झेंडू उत्पादक, साकुर, जि. नाशिक.
झेंडू फुलांचे पावसाने झालेले नुकसान
झेंडू फुलांचे पावसाने झालेले नुकसान

नाशिक  : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील सिन्नर, इगतपुरी तालुक्यात झालेल्या पावसामुळे द्राक्षबागा, टॉमटो, सोयाबीनचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तसेच झेंडू फुलांनाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. दिवाळी सणाला सुरवात झाली असतानाच झेंडू उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

इगतपुरी तालुक्यातील साकुर गावाला पावसाचा प्रामुख्याने फटका बसला आहे. सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी, वंजारवाडी भागात हजारो एकर क्षेत्रावरील झेंडू फुलांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातून नाशिक शहरासह मुंबई, वाशी, दादर मार्केटला मोठ्या प्रमाणावर झेंडू जातो. जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, निफाड, चांदवड या तालुक्यात झेंडूचे पीक हजारो एकरांवर घेतले जाते. दसरा व दिवाळी सणासाठी येथील शेतकरी झेंडू उत्पादनाचे नियोजन करतात. पिवळा व केसरी झेंडू अशा विविध वाणांच्या झेंडूचे उत्पादन घेतले जाते. मात्र ऐन तोडीच्या हंगामातच पावसामुळे फुलांवर करपा पडला असून, उत्पादन घटले आहे. ऐन दिवाळी सणात फुलाचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

प्रामुख्याने दिसून येत असलेले नुकसान  

  • झेंडू झाडाची पाने खराब होण्यासह फुलांवर काळे डाग पडले आहेत. 
  • पावसाच्या थेंबांमुळे फुले काळवंडली आहेत. 
  • फुलांमध्ये पाणी गेल्याने ती आतून सडली आहेत. 
  • फुलांना ताजेपणा आहे, मात्र प्रतवारीवर परिणाम झाला आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com