Marigold growers celebrate Diwali in Nashik district
Marigold growers celebrate Diwali in Nashik district

नाशिक जिल्ह्यात झेंडू उत्पादकांनी साधली दिवाळी

नाशिक : झेंडूला शेतकऱ्यांच्या बांधावर प्रतिकिलो १२०, तर बाजारात १५० रूपये दर मिळाला. तर, किरकोळ बाजारात १८० ते २५० प्रतिकिलो प्रतवारी नुसार दर मिळत आहे.

नाशिक : दसरा बाजाराच्या पार्श्वभूमीवर परतीच्या पावसामुळे  मोठे नुकसान झाले. त्यामुळे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. मात्र चालू वर्षीच्या दिवाळी बाजाराच्या पार्श्वभूमीवर चांगले उत्पादन हाती आले. झेंडूला शेतकऱ्यांच्या बांधावर प्रतिकिलो १२०, तर बाजारात १५० रूपये दर मिळाला. तर, किरकोळ बाजारात १८० ते २५० प्रतिकिलो प्रतवारी नुसार दर मिळत आहे. त्यामुळे काहीअंशी दिवाळीचा बाजार शेतकऱ्यांनी साधला आहे. 

दसऱ्याला नुकसान अधिक असल्याने शेतकऱ्यांना मार्केटचा अंदाज आला नाही. परिणामी, बाजारात आवक कमी, त्यात फुलांची प्रतवारी घटल्याने दरात घसरण होईल, अशी स्थिती होती. मात्र आवक कमी असताना उठाव असल्याने दरात मोठी वाढ झाली.

जिल्ह्यात चांदवड, नाशिक, इगतपुरी, सिन्नर व दिंडोरी तालुक्यातील शेतकरी झेंडूची लागवड करतात. मागणी असल्याने अनेकांनी थेट विक्रीला प्राधान्य दिले. उत्‍सवाच्‍या पूर्वसंध्येलाच नाशिक शहरातील रविवार कारंजा, अशोकस्‍तंभ, पंचवटीतील गोदाकाठ परिसर, गाडगे महाराज पूल, द्वारका, आडगाव नाका, पेठ नाका, म्हसरूळ, नाशिक रोड, सातपूर अशा विविध भागात झेंडू विक्रेत्यांनी शेकडा १८० ते २०० रुपयांपर्यंत विक्री केली.

  झेंडू बाजाराची स्थिती

 अतिपावसाने नुकसान वाढल्याने उत्पादनात घट  फुलांच्या प्रतवारीत काही प्रमाणात घट  मागणीच्या तुलनेत आवक कमीच  थेट विक्रीवर झेंडू उत्पादकांचा भर

परतीच्या पावसामुळे तयार होणाऱ्या फुलांच्या कळ्यांमध्ये पाणी गेले. त्यामुळे तयार फुलांची प्रतवारी व उत्पादन घटले आहे. त्यामुळे मागणी वाढली. व्यापाऱ्यांनी स्वता येऊन खरेदीची मागणी नोंदविली. त्यामुळे दर जरी वाढले असले तरी उत्पादनाच्या तुलनेत उत्पन्नाची जुळवाजुळव होईल एवढेच. - सूरज सहाणे, झेंडू उत्पादक, साकुर, ता. इगतपुरी

व्यापाऱ्यांनी दसऱ्याला ५० रुपयांनी खरेदी केली. तर १५० रुपयांपर्यंत विक्री केली. अगोदर मागणी व पुरवठ्याचा अभ्यास केला नाही. तिथेच गणित फसले. कमी भावात व्यापाऱ्यांना फुले दिल्याने नुकसान झाले. मात्र आता आम्ही थेट विक्री करणार आहोत.  - रवींद्र गोरडे, झेंडू उत्पादक, झेडलेझुंगे, ता. निफाड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com